लग्नसमारंभात नववधूची एन्ट्री सहसा कसा होतो? एकतर नवरीला पालखीत आणले जाते किंवा त्यांच्यासमोर फुलांची चादर पसरवली जाते ज्यावरून ती चालत येते. नवरीच्या एन्ट्रीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. एखाद्या राजकन्येप्रमाणे प्रत्येक नववधूला लग्नात एंट्री हवी असते. पण एका नववधूने अशी एंट्री केली आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. वधूची एन्ट्री पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो.. तुम्ही वधूचे कौतुक कराल. नववधूच्या या अनोख्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसली नवरी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक नवरी चक्का स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे. ही नववधू एखाद्या कुशल दुचाकीस्वाराप्रमाणे अगदी सहज बाईक चालवत आहे. कोणत्याही अडचणीशिवाय रस्त्यावर स्पोर्ट्स बाईक वेगाने चालवणाऱ्या नवरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवरीचे बाइक चालवण्याचे कौशल्य पाहून लोकांना आश्चर्य वाटते. या व्हिडिओमध्ये ही नवरी संपूर्ण लग्नाच्या पोशाखात दिसत आहे. नवरीने बंगाली पद्धतीचा साडी नेसली असून दागिने परिधान केले आहे. बंगाली नववधूच्या पोशाखात बाईक चालवणाऱ्या नवरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. हा व्हिडिओ @rider_girl_kajal नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत३.५० लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
do you hear about diesel paratha at Chandigarh
VIDEO : डिझेल पराठा कधी खाल्ला का? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली जोरदार टिका, शेवटी मालकाने सांगितले…
phone accidents video goes viral on social media
VIDEO : रस्त्यावरून चालताना फोन बघायची सवय आहे? तुमचाही होऊ शकतो असा अपघात, व्हिडीओ होतोय व्हायरल
panjabi bride dance on marathi song
Video : पंजाबी नवरीने केला मराठी गाण्यावर डान्स; मराठमोळ्या लूकमध्ये केली मंडपात एन्ट्री, पाहा व्हिडीओ
Dolphin Spotted at Bandra and Juhu Beach
मुंबईच्या जुहू बीचवर पुन्हा एकदा दिसला डॉल्फिन; मात्र सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल होण्याचं कारण काय?
Helmet save bike rider's life
बाईक चालवताना डोक्यावर आदळला जेसीबीचा पत्रा; VIDEO पाहून तुम्ही देखील हेल्मेटशिवाय घराबाहेर पडणार नाही
Crashed the new car on the first day
नाद केला; पण वाया गेला… नव्या गाडीला घरी आणण्याआधीच लावली अशी वाट; VIDEO पाहून युजर्स म्हणाले…
Delhis Vada Pav Girl Get Into Ugly Fight With Crowd On Streets
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral

हेही वाचा – Video : फॅशन शोमध्ये चिमुकलीचा जलवा! रॅम्पवर चालताना अचानक पडली अन्..; आत्मविश्वास पाहून प्रेक्षकांनी वाजवल्या टाळ्या

हेही वाचा – नवरा रोज ब्रश अन् अंघोळ करत नाही म्हणून महिलेने मागितला घटस्फोट! कोर्टाने सुनावला निर्णय

‘ती लग्नाची मिरवणूक सोडून पळून जातेय’

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बंगालमधील काजल दत्ताचा आहे. जो एक व्यावसायिक बाईक रायडर आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर बाईक राइडिंगचे आणखी बरेच व्हिडिओ आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘बंगाली मुली अप्रतिम आहेत.’ ‘प्रत्येक नववधूकडे हा स्वॅग असावा’, अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली आहे. दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे, ‘भाऊ, ती लग्नाची मिरवणूक सोडून पळून जात आहे.’ एकाने बंगाली नवरी पाहून म्हटले, “खूब भालो” म्हणजे “खूप छान.”