फिल्मी नवरी!! शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये वधूने गाडीच्या बोनेटवर बसून वराला केले प्रपोज; Video Viral

व्हिडीओमध्ये वधू चालत्या कारच्या बोनेटवर लेहेंगा आणि दागिने घालून बसलेली दिसत आहे.

Bride Viral Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: witty_wedding / Insatagram)

लग्नाचे अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. त्यामध्ये वधू आणि वर, मिरवणूक, पुष्पहार आणि नातेवाईकांच्या मजेदार कृत्यांचे व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ (viral video)सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये वधू चालत्या कारच्या बोनेटवर लेहेंगा आणि दागिने घालून बसलेली दिसत आहे. ही फिल्मी नवरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

वधूच्या या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूरच्या एका चित्रपटातील संवाद ऐकू येतो. श्रद्धा कपूरचा ‘मुझे शादी करनी थी तुमसे’ हा डायलॉग बॅकग्राउंडमध्ये वाजवला जात आहे. व्हिडीओमध्ये नववधू शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या स्टाईलची कॉपी करत आहे.

(हे ही वाचा: मुलाने आणली इंजिनिअर सून, सासूने सांगितलं जेवण बनवायला आणि मग…; बघा हा मजेशीर Viral Video)

(हे ही वाचा: Video Viral:…आणि काही सेकंदात सापाने केली उंदराची शिकार)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या नववधूचा व्हिडीओ witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “लग्नासाठी उत्सुकता”. वधूच्या या व्हिडीओने इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर, वधू-वराचा कोणताही व्हिडीओ व्हायरल झाला की, बहुतेक युजर्स त्याचे कौतुक करतात, पण या व्हिडीओबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. मुलीच्या या व्हिडीओवरून अनेक लोक तिला सल्ला देत आहेत. एका इंस्टाग्राम युजरने लिहिले की, “तुम्ही उन्हात लग्न कसे करणार. तुम्ही गाडीत बसला नाहीत. तुम्ही बाहेर बसला आहात”. तर दुसऱ्या युजरने दिल्ली पोलिसांना विचारले की चालत्या गाडीच्या वर बसण्याची परवानगी आहे का? त्यांनी लिहिले, “@delhi.police_official चालत्या वाहनाच्या बोनेटवर बसून व्हिडीओ शूट केला जात आहे… हे काय आहे?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bride sat on bonnet of the car and proposed to groom video viral ttg

Next Story
Video Viral:…आणि काही सेकंदात सापाने केली उंदराची शिकार
फोटो गॅलरी