सध्या सर्वत्र लगीनसराई सुरू आहे. लग्नामध्ये घडणाऱ्या गमतीजमतींचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दिसत आहेत. कधी लग्नमंडपातील डान्स किंवा नवरा नवरीची भन्नाट एन्ट्री असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असे व्हिडीओ अगदी कमी वेळात व्हायरल होतात. नेटकऱ्यांच्या मनाला भावलेला असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी तिच्या कुत्र्याला जेवण भरवत असल्याचे दिसत आहे.

तुम्ही अनेकांकडे पाळीव प्राणी पाहिले असतील, त्यांच्यावर त्या घरातील मंडळींचा फार जीव असतो. पण एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी किंवा लग्नकार्यासारख्या मोठ्या आणि सर्वजण व्यस्त असणाऱ्या प्रसंगी या प्राण्यांकडे दुर्लक्ष झालेले तुम्ही पाहिले असेल. अनेकवेळा अशा प्रसंगी या प्राण्यांची दखलही घेतली जात नाही. मात्र व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये वेगळेच चित्र दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरी तयारी करत असल्याचे दिसत आहे, तीची तयारी अर्धवट झाल्याचे दिसून येत आहे. पण तयारी थांबवत या नवरीने कुत्र्याला जेवू घालण्यासाठी थोडावेळ ब्रेक घेतला आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: लिफ्ट बंद पडताच त्यात तीन लहान मुली अडकल्या अन्…; Viral Video ने वाढवली पालकांची चिंता

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: बाप तो बापच! झोपलेला मुलगा खाली पडू नये म्हणून या माणसाने काय केले पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सीमार्क मेकअप’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील नवरीची काळजी पाहून नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली असून, प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या प्राण्यांची अशीच काळजी घ्यायला हवी अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.