लग्नसमारंभात नातेवाईक नाचले नाहीत तर संभराभांची मजा अपूर्णच राहते. दुसरीकडे, नातेवाइकांना विनोदी वृत्ती आणि नृत्याची चांगली जाण असेल, तर मेळ चांगला बसतो. सध्या अशाच एका नवरीच्या मामा आणि काकांचा लग्नाता डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मामा आणि काकां हा डान्स पाहून तुम्हीही हसू आवरू शकणार नाही. हा डान्स परफॉर्मन्स पाहून संगीत कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक व्यक्तीला मनापासून हसायला भाग पाडतो आहे.

मामा-काकांचा मजेदार डान्स

खुशबू सिन्हा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एका संगीत कार्यक्रमाचा आहे, ज्यामध्ये काका आणि मामाचा डान्स परफॉर्मन्स सुरू आहे. डोळ्यावर गडद चष्मा घालून काका आणि मामा पूर्ण जल्लोषात नाचताना दिसत आहे. प्रेक्षकांना वाटतं की, कदाचित काही धमाल डान्स असेल, पण नंतर शक्तीमान या प्रसिद्ध टेलीव्हिज शोचं टायटलं गाणं वाजतं. काका आणि मामा खूप उत्साहाने शक्तीमानप्रमाणे गोल गोल फिरू लागतात. त्यानंतर “पहला नशा, पहला खुमार”हे गाणे वाजते. त्यावर हे काका मामा आणखीच मजेशीर पद्धतीने डान्स करतात जो पाहून लोक पोट धरून हसायला लागतात. मामा – काकांचा हा डान्स पाहून लग्नात आलेल्या पाहुण्यांना आणि नवरा नवरीला हसू आवरता येत नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काकांना हा व्हिडीओ

हेही वाचा – मुलगा असावा तर असा! तरुणाने चक्क आईला कार चालवायला शिकवले, लाँग ड्राइव्हचा आनंद लुटणाऱ्या माय-लेकाचा Video Viral

लोक म्हणाले- आमचे काका असे नाही

हा व्हिडिओ ५ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला असून ९३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, “व्वा, ते इतके चांगले नातेवाईक आहेत, ते आम्हाला हसवतात.” दुसऱ्याने लिहिले,”हे पूर्णपणे अद्वितीय आहे.” तिसरे म्हणजे, “आमच्या ठिकाणी आम्ही मामा आणि मामाची समजूत घालताच कार्यक्रम संपेल.”