सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर, तर कधी विचित्र घटना व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात नाइटसूट घालून एका वधूला फेरे घ्यायचे होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एका वधूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात वधू टॉपमध्ये पारंपरिक वेषात आहे. मात्र तिने लेहंगाऐवजी जीन्स घालण्याला पसंती दिली आहे. हा व्हिडिओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यात वधूची ओळख मुद्रा भगत असल्याचं कळतंय. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून सोशल वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत वधू लाल पारंपरिक वस्त्रात नटूनथटून उभी आहे. दागिने आणि शृगांर केला आहे. मात्र लेहंग्याऐवजी जीन्स परिधान केली आहे. वऱ्हाडी मंडळी वधूला लग्नमंडपात नेण्यासाठी थांबली होती. तेव्हा त्यांनी तिला बघताच आश्चर्य व्यक्त केलं. यावेळी वधून सांगितलं की, “मी लेहंगा नाही घालणार, मी जीन्समध्ये येऊ इच्छित आहे”. वधूने असं बोलताच सर्वजण हसू लागले. तेव्हा एका नातेवाईकाने सांगितलं, चला हीला असंच लग्न मंडपात घेऊन जाऊयात.

Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

या व्हिडिओ आतापर्यंत ७ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकजण या व्हिडिओखाली कमेंट्स करत आहे. “तुझं लग्न आहे, तू तुझ्या पद्धतीने कर”, असं एका युजर्सने लिहीलं आहे. दुसऱ्याने लिहीलं आहे की, “मग दुपट्टा, दागिने आणि ब्लाउज कशासाठी?”. या व्यतिरिक्तही अनेकांनी कमेंट्स दिल्या आहेत. सध्या काहीतरी वेगळं करण्याचा तरुणांचा प्रयत्न असतो. सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रकार करत असतात. लग्न ठरलेली जोडपीही लग्नसोहळा लक्षात राहावं यासाठी खास प्लानिंग करत आहे.