मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे आलेल्या पुरात दोन ब्रिज कागदाप्रमाणे वाहून गेले. मनिखेडा धरणातून हे पाणी सोडण्यात आलं होतं. पाण्याच्या प्रवाह इतका होता की, नदीवर असणारा ब्रिज एका क्षणात कोसळला आणि वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याआधी माहिती देताना धरणाचे १० दरवाजे उघडले जाणार असून फटका बसणाऱ्या गावांना अलक्ट करण्यात आल्याचं सांगितलं होतं.

हे ब्रिज जिल्ह्याला ग्वालियरशी जोडत होते.

व्हिडीओत दिसत असणाऱ्या याच ब्रिजवर २०१३ मध्ये चेंगराचेंगरी होऊन ११५ भाविकांचा मृत्यू झाला होता. २००९ मध्ये हा ब्रिज बांधण्यात आला होता. या ब्रिज दातिया जिल्ह्याला दुर्गा मंदिर असणाऱ्या रतनगड शहराशी जोडला गेला होता.