Viral Video : लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कुणी गाणी म्हणताना दिसतो. एवढंच काय तर नवरेदव नवरीचे उखाण्याचे व्हिडीओ सध्या चर्चेत येत असतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीचा भाऊ तिच्यासाठी डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हालाही तुमच्या बहिणीची किंवा भावाची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

भावा-बहिणीचं नातं आपण पाहिले तर कधी मस्ती तर कधी रुसवा.सोशल मीडियावरही या नात्यासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.कधी हे व्हिडिओमध्ये बहीण-भावाची तुफान मस्ती असते तर कधी बहीणीच्या लग्नात रडणारा भावू असतो.मात्र सध्या दोघांच्याही डान्सचा धम्माकेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये भाऊ-बहिणीची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये दोघांनीही खानदेशी गाण्यावर असा अप्रतिम डान्स केला आहे की, तो पाहिल्यानंतर तुमची नजर चुकवल्याशिवाय राहणार नाही. ‘ही झुमकावाली पोरं’ या गाण्यावरील दोघांचा हा परफॉर्मन्स अप्रतिम आहे, जो सर्वजण पाहतच राहतात.

प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर भाऊ बहिण तिरकले आहेत.

पाहा व्हिडीओ

बहीण-भावाचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर सध्या चांगलाच व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या kiran_phulpagare07 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.आतापर्यंत व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी लाईक्स दिलेले आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,”एकदम कडक”तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,”खूपच छान”अशा अनेक सर्वांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.