Viral Video : बहीण भावाचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात पण एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. एका भावासाठी सर्वात कठीण दिवस असतो जेव्हा त्याची बहीण सासरी जाते. लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या होतात आणि डोळ्यांतून अश्रुधारा वाहते. प्रत्येक भावाला या क्षणाला कधी ना कधी सामोरे जावे लागते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बहिणीच्या लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भाऊ बहिणीला हळद लावताना ढसा ढसा रडतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही अश्रु अनावर होणार. सध्या या बहीण भावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सर्वजण नवरीला हळद लावत आहे. त्यानंतर भाऊ बहिणीला हळद लावायला जातो. बहिणीला हळद लावताना तो फोटो काढतो. याच दरम्यान भाऊ भावुक होतो आणि रडायला लागतो भावाला रडताना पाहून बहीण सुद्धा रडते. पुढे दोघेही बहीण भाऊ एकमेकांना मिठी मारत ढसा ढसा रडताना दिसतात. तेव्हा नातेवाईक येतात आणि त्यांना सावरतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.

हेही वाचा : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आलं अंगात; शाळेबाहेर येऊन असं काही करू लागल्या… VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल

vaishnav_lavande_96k’या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहीण भावाचं नातं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोळे भरून आले” तर एका युजरने लिहिलेय, “बहीण जेव्हा सासरी जाते तेव्हा खुप दु:ख होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “बहीणच प्रेम कधी ही कमी होत नाही” एक युजर लिहितो, “मला बहीण नाही पण व्हिडीओ बघून बहीण असल्याचा भास झाला आणि डोळ्यात पाणी आलं उर भरून आला…..” तर एक युजर लिहितो, “आमच्या आयुष्यात नाही असा क्षण” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही लोक व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.