Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्सचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. तुम्ही आजवर डान्सचे वेगवेगळे प्रकार पाहिले असेल. महाराष्ट्रात लावणी हा नृत्यप्रकार सर्वात लोकप्रिय आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहीण भाऊ लावणीवर थिरकताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल.

बहीण भावांनी केली अप्रतिम लावणी

लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण आवडीने लावणी सादर करतात आणि सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करतात. असेच या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल तरुण तरुणी लावणी सादर करताना दिसत आहे. काही महिला सुद्धा या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुरुवातीला एक तरुणी सुंदर लावणी सादर करताना दिसते तेव्हा तिचा भाऊ तिथे येतो आणि बहिणीला साथ देत तिच्याबरोबर लावणी सादर करताना दिसतो. दोघेही बहीण भाऊ अप्रतिम लावणी सादर करतात. त्यांची ऊर्जा, चेहऱ्यावरील हावभाव आणि लावणी स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हे बहीण भाऊ स्वत: नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे. तिथे जमलेले लोक सुद्धा त्यांना प्रोत्साहन देतान दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्व जण रंगाने माखलेले दिसत आहे. हा व्हिडीओ जूना आहे जो आता पुन्हा व्हायरल होत आहे. कदाचित हा व्हिडीओ रंगपंचमीचा असावा.

a female teacher teach dance to child students on Bumbro Bumbro song
“बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो” शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Grandmother's romantic dance with young man
‘मुझसे अब दूर ना जा…’ गाण्यावर आजींचा तरुणासोबत रोमँटिक डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “आजी आता जरा…”
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
a young girl dance with her cute grandmother
मराठमोळ्या आजी नातीने जिंकले सर्वांचे मन! सामी-सामीवर केला सुंदर डान्स, VIDEO एकदा पाहाच
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच
Killy Paul's Dance on Malayalam Song
किली पॉलचा मल्याळम ‘इल्युमिनाटी’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
A 95 year old woman Show her remarkable dancing skills Video Shared by IRAS Ananth Rupanagudi must watch heartwarming clip
कलेला वय नसते! साडी नेसून नृत्यकौशल्य दाखविणाऱ्या ९५ वर्षीय आजींना पाहा; VIDEO तील ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन

हेही वाचा : Video: ‘देव तारी त्याला कोण मारी’, भरधाव कारनं मुलीला उडवलं; १० फूट हवेत फेकली गेली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल

yogic_girl_16 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भाऊ बहिणीमधील मस्ती, मारा मारी पाहिलीच असेल पण हा जल्लोष सुद्धा पाहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर. भावा बहिणीच्या जोडीला काही पर्यायचं नाही. असंच मजेत जीवन जगा एकमेकांना शेवट पर्यंत अशीचं साथ द्या” तर एका युजरने लिहिलेय, “नादच खुळा ताई दादा” आणखी एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.