शेतीच्या बांधावरून होणारी भांडणे ही पिढ्यानपिढ्या चालूच आहेत. प्रत्येक गावात बांधाच्या कारणावरून नेहमीच भांडण होत असतात. जमिनीवरून होणारे हे भांडण काही वेळेस खुप गंभीर वळण घेते आणि गोष्ट पार हाणामारी पर्यंत जाते. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की एखाद्याचा जीवही जातो. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे बांधावरून वाद झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात आहेत. अशाच शेतीच्या बांधावरील वादाचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतीच्या बांधावरुन दोन गटात तुफान हाणामारी सुरु आहे. सुरुवातीला दोन गटातील लोकांमध्ये फक्त बाचाबाची होते, मात्र नंतर दोन्ही गटातील महिला, पुरुष आणि तरुण मुलं एकमेकांना मारहाण करायला सुरुवात करतात. याचं स्वरुप इतकं भयंकर होतं की, बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत होत. दोन्ही गटातील लोक एकमेंकाना लाठ्या काठ्या, कोयत्याने मारताना दिसत आहेत. यावेळी एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता आहे, मात्र याचं कोणालाही भान नाहीये. शेवटी मात्र या भांडणामध्ये एक जण रक्तबंबाळ झाला. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोन भावाभावांमध्येच ही भांडणं लागल्याची माहिती मिळतेय.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चुके काळजाचा ठोका एक झोका! Video मध्ये पाहा कसा दोरीवर झुलतोय हा बोका

बांधावरून भांडणे झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. कधी कधी जीवही जातो. त्यापेक्षा एकमेकांना समजून घेत जर शेती केली तर हे वाद होणारच नाही अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.