मार्शल आर्ट्सने हॉलिवूड सिनेमांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता ब्रूस लीचा मृत्यू अति पाणी प्यायल्यामुळं झाला आहे, अशी धक्कादायक माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. ब्रूस लीचा (३२) मृत्यू १९७३ मध्ये झाला होता. सेरेब्रल एडीमा आणि ब्रेन स्वेलिंगच्या कारणामुळं तसंच पेनकिलरच्या सेवनामुळं ब्रूसलीचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. पण त्याचा मृत्यू अति पाणी प्यायल्याने झाला असावा,अशी माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. मूत्रपिंडावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका समुहाने हे अध्ययन केलं असून येत्या डिसेंबर २०२२ मध्ये यासंबंधित माहिती प्रसारित केली जाणार आहे.

आणखी वाचा – “वो चाहे ना चाहे”, मी तर चहाची टपरी चालवणारंच, ‘M बेवफा चहावाल्याची’ अजब प्रेमकहाणी वाचाच एकदा


अति पाणी प्यायल्याने ब्रूसलीच्या मूत्रपिंडावर घातक परिणाम झाला. तसंच आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन रक्तातील सोडीयमचं प्रमाण कमी झालं. द्रवरुप पदार्थांच्या डाएटमुळं ब्रूसलीने पाणी पिण्याचे प्रमाण वाढवलं असावं. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यूस आणि प्रथिनयुक्त ड्रिंक्सचाही समावेश असू शकतो. विशेष म्हणजे गांजाच्या सेवनामुळं ब्रूसलीची तहान वाढली, असा दावा वैद्यकीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

ब्रूसलीने धोकादायक गोष्टींचं सेवन केल्यामुळं त्याच्या शरीरातील रक्तात सोडियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झालं. त्यामुळे पाणी पिणं आणि ते उत्सर्जीत करणं यावर घातक परिणाम झाला. मूत्रपिंडाच्या आजारामुळं तसंच अति पाणी प्यायल्याने ब्रूसलीचा मृत्यू झाला, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. अति पाणी प्यायल्याने त्याचं मूत्राशयातून योग्य पद्धतीने उत्सर्जन झालं नाही तर, hyponatraemia,सेरेब्रल एडीमा यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.

आणखी वाचा – OTT वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Amazon Prime, Disney+Hotstar सब्सक्रिप्शन मिळणार मोफत, असे करा Login

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सर्वांना एक प्रश्न नक्की पडला असेल की, अति पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक आहे का? अति पाणी प्यायल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. अति पाणी प्यायल्याने इंट्राक्रॅनियलचा प्रेशर वाढण्यास मदत होते. पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊन इंटॉक्सिकेशन आणि ओव्हरडिहायड्रेशनची लक्षणं जाणवू शकतात, अशी माहिती या संशोधनाच्या माध्यमातून समोर आली आहे, अशी माहिती, अशी माहिती वडोदराच्या स्टर्लिंग रुग्णालयातील जनरल फिजिशियन, वरिष्ठ सल्लागार डॉ मनोज मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.