scorecardresearch

Premium

कॅफेचं बिल कोण भरणार? दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांना बुक्क्या-बुक्क्यांनी धुतलं; पाहा Video

दोन मित्रांमध्ये कॅफेचे बिल भरण्यावरून तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

brutal fight among friend among friends inside cafe over paying bills slapping video viral
कॅफेचं बिल कोण भरणार? दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांना बुक्या-बुक्क्यांनी धुतलं; पाहा Video (photo – @gharkekalesh twitter)

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ असे असतात जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात; तर काही खूप घाबरवतात, तर काही व्हिडीओ असे असतात जे तुम्हाला पोट दुखेस्तोवर हसवतात. विशेष म्हणजे हल्ली मेट्रो, रेल्वे किंवा लोकांची गर्दी असलेल्या इतर ठिकाणचे मारामारीचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. जे पाहून काही वेळा खूप भीती वाटते, तर काही वेळा हसायला येते. सध्या सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन मित्रांमध्ये कॅफेचे बिल भरण्यावरून तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

यात एक मित्र दुसऱ्या मित्राला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. त्याच्यात इतका द्वेष होता की, त्यांचे भांडण पाहून कोणी त्याला सोडवायलाही जायची हिम्मत केली नाही. भर कॅफेमध्ये झालेली ही मारामारी पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा दुसऱ्या मुलाला सतत कानाखाली वाजवत आहे. यावेळी उपस्थितीत मुलींसह बाकीचे मित्र आश्चर्यचकित होऊन हे सर्व पाहत आहेत. यानंतर ते मध्ये पडून कसेतरी दोघांचे भांडण सोडवतात.

financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
Dharavi redevelopment eligible and ineligible slum dwellers house mumbai
धारावी पुनर्विकासात सर्व झोपडीवासीयांचे पुनर्वसन ! पात्र वगळता इतरांना धारावीबाहेर घरे ?
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
akola mahayuti news in marathi, akola politics marathi news, akola mahayuti coordination news in marathi
अकोल्यात महायुतीमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान

हाणामारीचा हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यातील कॅप्शननुसार, कॅफेचं बिल कोण भरणार यावरून ही हाणामारी झाली असे सांगितले जात आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. पैशावरून असे भांडण होत असेल तर अशी मैत्री काय कामाची, असे मत काहींनी नोंदवले आहे; तर काहींनी मज्जा घेत म्हटले की, ज्याप्रमाणे माझे मित्र कंजूष आहेत, मी देखील लवकरच तसा बनणार आहे. अशाप्रकारे लोक सोशल मीडियावर या व्हिडीओची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brutal fight among friend among friends inside cafe over paying bills slapping video viral sjr

First published on: 10-12-2023 at 12:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×