Viral Video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ बघून अंगावर काटा येतो. आता पंजाबमधील लुधियाना येथून एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. या घटनेत एका चिमुकल्यासह रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेचा अपघात होता होता वाचला.

आयुष्य अतिशय क्षणिक आहे. आता हसत-खेळत असणाऱ्या माणसाचं पुढच्या क्षणी काय होईल, याची कोणालाही कल्पना नसते. पण, असा एखादा हादरा बसतो की, आपण सुन्न होतो. अशीच एक मन हेलावणारी, हृदयद्रावक घटना लुधियाना परिसरात घडली आहे. पंजाबमधील लुधियाना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात चार मजली इमारत कोसळली; परंतु त्यातून एका महिलेचा गंभीर अपघात होता होता वाचला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tragic shocking Video: 4-Yr-Old Girl Drowns In Ganga As Her Aunt Makes Instagram Reel In UP’s Ghazipur
Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Father daughter love vidaai emotional video goes viral father daughter bonding video
“डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे” VIDEO पाहून प्रत्येक मुलीच्या डोळ्यात येईल पाणी
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Madhya Pradesh Shocker: Pregnant Woman 'Forced' To Clean Blood-Stained Hospital Bed After Husband's Murder In Dindori
इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Firecrackers video
ऐन दिवाळीत मुलांच्या हॉस्टेलमध्ये पेटला वाद! विद्यार्थ्यांनी एकमेकांवर सोडले रॉकेट, धक्कादायक घटनेचा Video Viral
navra maza navsacha 2
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”

हेही वाचा… “या दोघींना पट्ट्याने मारायला हवं”, असं का म्हणतायत नेटकरी, VIDEO पाहून कळेल नेमकं कुठे चुकलं

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. व्हिडीओमध्ये एक इमारत अचानक कोसळताना दिसतेय. तिथे आजूबाजूला असलेली माणसं इमारत कोसळल्याचं पाहून तिथून आपला पळ काढताना दिसतात. या गर्दीत एक महिला आपल्या चिमुकल्याला उराशी घेऊन तिथून धाव घेताना दिसतेय.

हेही वाचा… “शेवटी विषय संस्कारांचा होता”, दोन मुलींनी केलेल्या कृतीने वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहून कराल कौतुक

मंगळवारी (१ ऑक्टोबर) लुधियानाच्या जुन्या बाजारात ही घटना घडली. सुमारे १०० वर्षे जुनी असलेली इमारत कोसळून खाली पडली. इमारत कोसळल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्त्तानुसार या घटनेत सुमारे दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत महिला आणि तिचा मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा… VIDEO: “ऐ, आधी काच खाली घे मग पुढचं बोल”, पुण्यात रिक्षाचालकाची दादागिरी; भररस्त्यात काय केलं पाहा

हा व्हिडीओ @hamariawaz_news या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “लुधियानाच्या जुन्या मार्केटमध्ये कोसळणाऱ्या इमारतीखाली येता येता एक महिला थोडक्यात बचावली. जुन्या मार्केटमधील १०० वर्षांपूर्वीची जुनी इमारत अचानक कोसळली. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.