building security guard viral video : जगात भूत अस्तित्वात आहे की नाही? याबाबत अनेकांचे वेगवेगळे विचार भावना आहेत. काही जण बालपणी आजी- आजोबा, आई-वडिलांकडून भुताच्या गोष्टी ऐकतात. तर काहींना टीव्हीवरील हॉरर मूव्ही आणि सीरिअल बघून भूताची संकल्पना समजून घेतात. काहींना मित्र-मैत्रिणींकडून भूताची माहिती होते. यात भूत अतिशय विचित्र दिसतात, त्यांचे पाय उलटे असतात, अशा अनेक तऱ्हेच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात. काही जण तर भूताशी मारामारी केल्याच्याही बतावणी करतात. वैज्ञानिकदृष्ट्या हे दावे फोल ठरले आहेत. मात्र, तरीही लोकांच्या मानेवरील भूत काही जात नाही. सध्या सोशल मीडियावर एका इमारतीतील भूताची प्रचंड चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे भूत आता सीसीटीव्हीतही कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेकांना इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृश्यांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते. व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत असा दावा केला जात आहे की, एक अदृश्य व्यक्ती रात्री ३ वाजता एका इमारतीत प्रवेश करते. यानंतर ती सुरक्षा रक्षकाशी काहीतरी बोलते. यानंतर सुरक्षा रक्षक तिला आत जाऊ देतो. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुरक्षा रक्षक दिसत असला तरी त्याच्याशिवाय कोणीही दिसत नाहीये, त्यामुळे हे दृश्य पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. कॅमेऱ्यात कैद झाले 'भूत' : या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, इमारतीच्या एंट्री गेटवर असलेल्या काउंटरवर सुरक्षा रक्षक बसल्याचे दिसून येते. रात्रीचे ३ वाजले आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकाशिवाय तिथे कोणीही दिसत नाही. मोबाइलमध्ये बघत सुरक्षा रक्षक आरामात बसला होता, पण सुरक्षा रक्षकाला इमारतीच्या आत प्रवेश करणारी एक व्यक्ती दिसते. तो खुर्चीवरून उठतो आणि तिच्या जवळ जातो आणि लाइन डिव्हायडर काढून तिला आत जाऊ देतो. पण, सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये सुरक्षा रक्षकाशिवाय तिथे इतर कोणीही नाही हे स्पष्ट दिसतेय, त्यामुळे हे दृश्य पाहताना फारच भयानक वाटतेय. More Trending Stories : ट्रेन दुसरी मिळेल पण जीव नाही! धावत्या ट्रेनमध्ये मुलासह महिलेला चढवण्याचा प्रयत्न, नंतर ज्याची भीती तेच झालं, पाहा VIDEO सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा कॅमेऱ्यात न दिसणाऱ्या व्यक्तीचे नेटिझन्सनी भूत असे वर्णन केले आहे. भूतांना कॅमेऱ्यात कैद करता येत नाही, असे मानले जाते. पण, इमारतीत 'भूत' शिरल्याचा दावा करत हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. X वर @crazyclipsonly नावाच्या हँडलवरही हा व्हिडीओ शेअर केल्याची माहिती आहे, ज्यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.