scorecardresearch

Premium

Building Stunt: बिल्डिंगच्या रेलिंगवर जीवघेणा स्टंट, छोटीशी चूक अन् उंचावरुन थेट कोसळला तरुण

Building Stunt video: सध्या रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. स्टंटसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Building Stunt
बिल्डिंगच्या रेलिंगवर जीवघेणा स्टंट

सोशल मीडियाची क्रेझ अशी आहे, की प्रत्येकाला त्याच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय व्हायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालावा. सध्या अशाच काही स्टंट व्हिडिओंनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. स्टंटसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जे पाहून इंटरनेट वापरकर्ते थक्क झाले आहेत. एक छोटीशी चूक अन् तरुणाचा जागीच जिव गेला असता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण इमारतीच्या रेलिंगवर स्टंटबाजी करत आहे. हा तरुण उभा असलेल्या इमारतीच्या बाजूलाच एक इमारत आहे. दोन्ही इमारतींमध्ये अगदी थोडसं अंतर आहे. या दोन इमारतींमधील अंतरात अतिशय कमी जागेत बॅकफ्लिप मारतो. मात्र पुढे जे होणार आहे याची या तरुणाला आणि व्हिडीओ पाहताना आपल्यालाही कल्पना नसते. हा तरुण बॅकफ्लिप मारतो आणि त्याचा हा स्टंट फसतो. तो थेट दोन्ही इमारतीच्या मधल्या गॅपमधून खाली पडतो. सुदैवानं या तरुणाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: लग्नात नवरदेवाला मित्रांनी गुपचूप पाजली दारु, नवरीला कळताच झालं…

मात्र कमेंट सेक्शनमध्ये बहुतांश युजर्सनी एकच प्रश्न विचारला आहे की, लोकांना जीव धोक्यात घालून काय मिळतं. काही लोकांनी असे धोकादायक स्टंट करू नका, असे आवाहनही केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Building stunt man fell down from height while doing stunt on building railing video viral srk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×