Bull Attacks Man Viral Video : पिसाळलेल्या बैलांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच दिल्लीतील एका घटनेत पिसाळलेल्या बैलाने एका वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे समोर आले होते, मात्र या घटनेत महिनेने धैर्याने स्वत:चा जीव वाचवला. पण, अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यात पिसाळलेला बैल रस्त्यावर धावत जाऊन एका बाईक एजन्सीमध्ये घुसतो, यानंतर तिथल्या लाल रंगाचे शर्ट घातलेल्या एका व्यक्तीवर तो जोरदार हल्ला करतो. शिंगाने त्याला हवेत उचलतो, यानंतर बैलाने जे काही केले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

धक्कादायक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून धावत एक बैल अचानक बाईक एजन्सीमध्ये घुसतो आणि दुसऱ्याच क्षणी लाल शर्ट घातलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. बैलाचा हल्ला इतका भीषण होता की, तिथे उपस्थित असलेले लोकही ते पाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातात. यावेळी पिसाळलेला बैल लाल रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीला शिंगांवर धरून थेट दुकानाच्या आत फरपटत नेतो. त्यानंतर शिंगांनी वर उचलून त्याला आपटणार असतो, पण तो तरुण पळून जातो; अन्यथा बैलाने त्याला तुडवलं असतं. यावेळी बैलाने एजन्सीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस केली, त्यामुळे संपूर्ण शोरूममध्ये गोंधळ उडतो. या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले असून सोशल मीडियावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य
Muramba
Video: “आता राजा-राणीचा संसार…”, संकटावर मात करत रमा-अक्षय आले एकत्र; ‘मुरांबा’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी म्हणाले, “कोणताच काटा…”

“देवानंतर पत्नीच…” रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिलं असं काही की VIDEO पाहून युजर म्हणाले, “भावाने अनुभव…”

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून काही जण हसत आहेत तर काहींना धक्काच बसला आहे. एका युजरने लिहिले की, “तुम्ही बैलाच्या आसपास असाल तर लाल रंगाचे कपडे घालू नका,” तर दुसऱ्याने मजेशीर पद्धतीने लिहिले की, “कदाचित बैलालाही बाईक घ्यायची असावी.” या व्हिडीओमुळे काही लोकांनी रस्त्यावरून बैलांसारख्या प्राण्यांच्या जवळून जाताना विशेष काळजी घ्यावी आणि लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.

Story img Loader