Bull Head Stuck Water Tank Video Viral : सध्या अनेक प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये फिरताना दिसतात. गावच्या ठिकाणी तर ही जनावरं बाजारपेठांमध्ये खाण्याच्या शोधात भटकताना दिसतात. अशाप्रकारे एक बैल पाण्याच्या शोधात बाजारात भटकत होता, यावेळी पाणी पिण्यासाठी म्हणून त्याने एका पाण्याच्या टाकीत मान टाकली, पण त्याची मान टाकीत अतिशय वाईटप्रकारे अडकून बसली, जी त्याला बाहेर काढणंही अवघड झालं. सध्या सोशल मीडियावर या बैलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बैल पुढे काय काय धुडगूस घालतो पाहू शकता.
व्हिडीओत भलामोठा बैल बाजारपेठेत धुमाकूळ घालताना दिसतोय. हा बैल टाकीत विचित्र स्थितीत अडकला आहे, की बाहेर येणे त्याला कठीण झालं, त्यामुळे संपूर्ण बाजारात त्याने गोंधळ निर्माण केला. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला असून अनेकजण त्यापासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत.
व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका बैलाच्या डोक्याला काळ्या रंगाची प्लास्टिकची पाण्याची टाकी अडकलीय. अडकल्यानंतर बैल इतका घाबरतो की, तो बाजारपेठत सैरावैरा धावू लागतो. त्याची अवस्था पाहून आजूबाजूचे लोक भयभीत होतात. तो बैल शहराच्या रस्त्यांवरून इतक्या बेभानपणे धावतो की लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतात.
यावेळी तो बैल एका व्यापाऱ्यालादेखील जोरात धडकतो. बैलाच्या अनियंत्रित धाडीमुळे संपूर्ण बाजारात घबराट पसरते. कोणताही अपघात टाळण्यासाठी लोक धावपळ करतात. तो बैल एका दुकानाच्या जिन्यालाही धडकतो, ज्यामुळे त्याची चिंता आणखी वाढते. काही काळासाठी वातावरण पूर्णपणे गोंधळाचे बनते.
पण, परिस्थिती चिघळल्यासारखी दिसताच तेथे उपस्थित लोक धाडस करून पुढे येतात आणि बैलाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एकत्र येऊन बैलाला शांत करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यातून टाकी काढण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला त्यांना बरीच अडचण आली, पण अखेरीस सर्वांनी मिळून बैलाला त्या संकटातून मुक्त केले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर, युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण बैलाला मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या त्या तरुणांचे कौतुक करत आहेत, तर काहीजण हे फारचं धक्कादायक होतं असं म्हणत आहेत.
