बैलाने सीटबेल्ट बांधून केली चक्क बाईकची सफर; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण| The bull rode the bike with his seatbelt on; You will also be shocked to see the viral video | Loksatta

बैलाने सीटबेल्ट बांधून केली चक्क बाईकची सफर; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये एक बैल रस्त्यावरन जात असलेल्या बाईकवर बसलेला दिसत आहे, जो पाहून वापरकर्ते देखील हैराण झाले आहेत.

The bull rode the bike with his seatbelt on
photo(social media)

Bull On Bike Viral Video: अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. कधी-कधी असे काही व्हिडीओ समोर येतात, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ते खरंच खूप आश्चर्यकारक असतात. नुकताच असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचेही मन थक्क होईल. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

वास्तविक, सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जुना आहे, पण पुन्हा एकदा हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये एक जड बैल दुचाकीवर बसलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक माणूस कसा रस्त्यावर बाईक चालवत आहे. बाईकवरील व्यक्तीच्या मागच्या सीटवर एक बैल बसलेला दिसतो, ज्याला काहीतरी बांधलेलं दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, बाईकच्या मागच्या सीटवर बसलेल्या बैलाने सीट बेल्ट बांधला आहे. व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की, हा व्हिडीओ रस्ता ओलांडून बाईकसमोर धावणाऱ्या कारच्या खिडकीतून रेकॉर्ड करण्यात आला आहे.

( हे ही वाचा: OMG! वाऱ्याच्या वेगाने पाण्यावर पळताना दिसले हरीण;व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का)

येथे पाहा व्हिडीओ

( हे ही वाचा: Viral Video: माणसाने पाण्यात शार्कसोबत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल)

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर animalsinthenaturetoday नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो लोक खूप बघत आहेत आणि शेअर करत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत ६ लाख ४० हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला २१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. काही युजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करत आहेत आणि त्याला अतिशय रोमांचक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-09-2022 at 12:53 IST
Next Story
VIDEO: रस्त्यावरुन गाड्या वेगाने धावत असतानाच ट्रेलरने अचानक टर्न घेतला अन् तितक्यात…, अपघात पाहून अंगावर काटा येईल