आपला गाव हागणदारी मुक्त बनवण्यासाठी बुंदेलखंडमधल्या मुलांनी नवी मोहिम हाती घेतली आहे. वारंवार बजावून ऐकत नसल्याने आता त्यांनी उघड्यावर शौच करणा-यांचे टमरेल घेऊन पळून जाण्याची नवी मोहिम हाती घेतली आहे. विविध शाळांमधल्या २५० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला असून पहाटेच घरातून ते या मोहिमेसाठी निघत आहेत.
वाचा : ५०० रुपयांच्या जुन्या नोटेपासून विद्यार्थ्याने केली विद्युत निर्मिती
उघड्यावर शौच करू नका असे वारंवार बजावून अनेकजण उघड्यावर शौचालयाला बसतात. यासाठी भारत सरकारने अनेक मोहिमा सुरू करुन गाव हागणदारी मुक्त बनवण्यासाठी प्रयत्न केला आहे. अभिनेत्री विद्या बालन, सचिन तेंडुलकर यासारख्या अनेक दिग्गजांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली आहे. गाव हागणदारी मुक्त बनवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अशातच बुंदेलखंडमधल्या शाळकरी मुलांनी देखील आपले गाव हागणदारी मुक्त बनवण्यासाठी कंबर कसली आहे. जवळपास २५० विद्यार्थ्यांची ही ‘वानर सेना’ पहाटेच्या वेळी शिटी वाजवत गावागावातून फिरते. ‘इंडिया टाईम्स’ने दिलेल्या बातमीत या एका गटात सहा ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. लोकांनी उघड्यावर शौचालयास बसणे टाळावे यासाठी त्यांच्या हा प्रयत्न सुरू आहे. जर कोणी उघड्यावर शौच करताना दिसले तर ही मुले त्यांचे टमरेल घेऊन पळून जातात.
लोकांना अद्दल घडावी यासाठी ही मोहिम राबवली जात आहे. तेव्हा वानर सेनेच्या या धुडगुसेला घाबरून लोक पळून जात आहे. मुलांच्या या मोहिमेमुळे उघड्यावर शौच करण्याचे प्रकारही कमी झाले असल्याचे इथल्या महानगर पालिकेने सांगितले आहे. तेव्हा वानर सेनेची ही मोहिम यशस्वी होताना दिसत आहे.