Shocking video: बाईक अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बाईकला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात नव्या कोऱ्या बाईला आग लागलेली पाहायला मिळतेय.उष्णतेचे वातावरण आहे, सर्वत्र उष्णतेच्या लाटेची दहशत आहे. अशा परिस्थितीत माणसे आणि वाहनेही उष्णतेचे बळी ठरत आहेत. रोज बाइक आणि कार जाळल्याचे व्हिडीओ समोर येतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही वाहनांना आग लागल्याच्या बातम्या येत आहेत. या कडाक्याच्या उन्हाळ्यात जर तुम्हाला बाईक किंवा कार जळताना दिसली तर तुम्हीही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण यात तुमचा जीवही जाऊ शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये बाईकला आग कशी लागली हे बघायला मिळते, एखादी व्यक्ती आग विझवायला जाताच बाईकमध्ये मोठा स्फोट होतो आणि ती व्यक्ती जिवंत जळून खाक होते.हो तुम्ही जे वाचताय ते खरंच घडलंय.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
Pavitra Jayaram Dies In a Car Accident
प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Bride and groom trolled for setting themselves on fire during wedding in US
आगीच्या ज्वाळासंह नवरा नवरीची लग्नात एन्ट्री, फोटोशूटसाठी जीव टाकला धोक्यात, Stunt Video Viral
Uttarakhand accident video
उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाईकस्वाराच्या बाईकमधून धूर कसा निघतोय हे दिसत आहे. बाईकमधून धूर निघत असल्याचे पाहून तिथे उपस्थित लोकांनी बाईकवर पाणी ओतण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत दुचाकीस्वारही त्याच्या दुचाकीकडे धूर कुठून येत आहे ते जवळून पाहण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूचे लोक पाण्याच्या पाईपमधून आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी अचानक स्फोट होतो आणि बाईक पेटू लागते. या अपघातात जवळ जवळ बरेच लोक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतात. त्याच्या संपूर्ण शरिराला आग लागते, अशा परिस्थिती ते रस्त्यावरच इकडे तिकडे पळू लागतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण प्रखर उन्हात एखाद्याला आग लागणे हे धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारे आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यानंतर यूजर्स त्यावर कमेंट करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बुलेट आणि स्पोर्ट्स बाइकची धडक; अपघात सीसीटीव्हीत कैद, नक्की चूक कुणाची कळेना? VIDEO एकदा बघाच

@krchoudhary0798 नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत यूजर्स व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…हा स्फोट इंधन टाकीत झाला. दुसऱ्या युजरने लिहिले, कसले लोक आहेत, त्या माणसाला वाचवण्याऐवजी त्याचा व्हिडिओ बनवत आहेत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, जळत्या वाहनापासून नेहमी दूर राहावे.