ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढतेय. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरात दिवसातील अनेक तास ट्रॅफिकमध्ये जातात. गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूमधील ट्रॅफिकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ट्रॅफिकमुळे नागरिक हैराण होताना दिसत आहेत. बऱ्याच वेळा हे ट्रॅफिक जॅम इतके लांब असते की यामुळे अनेकांच्या फ्लाइट, महत्त्वाच्या मीटिंग चुकतात. सध्या ट्रॅफिकचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यातून ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर आपला वेळ कसा सत्कारणी लावायचा याचे उत्तम उदाहरण देण्यात आले आहे.

बंगळुरू हे शहर देशातील आयटी हबऐवजी लवकरच ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळखले जाईल, या ट्रॅफिक जॅममुळे अनेकांना योग्य वेळी इच्छितस्थळी पोहचता येत नाही. कोणत्याही ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी अनेक तास आधी घरातून बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत फसलेल्या एका बस ड्रायव्हरचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, एक बसचालक ट्रॅफिकमध्ये फसला असताना आपला वेळ जेवणासाठी वापरत आहे.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

ट्रॅफिक जाममध्ये केले दुपारचे जेवण

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक बसचालक ट्रॅफिकमध्ये अडकल्याने दुपारचे जेवण करत आहे. यातून ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर लोकांनी त्या वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा याचे उत्तम उदाहरण देण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर saichandshabarish नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळपासून उपाशी, एक बासरी विकण्याची वाट पाहतोय; गरीब विक्रेत्याचा भावनिक Video इंटरनेटवर व्हायरल

ट्रॅफिक जामचा हा व्हिडीओ रेशीम बोर्ड जंक्शनजवळ बनवण्यात आला आहे. या व्हिडीओवर आता कमेंट करत युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने ‘अडचणीत संधी’ असे या परिस्थितीचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर वेळेचा योग्य वापर होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. तर दुसर्‍या युजरने सांगितले की, त्याने लोकांना ट्रॅफिक जाममध्ये एखादा चित्रपट पाहून पूर्ण करताना पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या ट्रॅफिकमधील एका तरुणीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत होता, ज्यात ही तरुणी ट्रॅफिकमध्ये फसल्याने स्कूटीवर लॅपटॉप ओपन करत काम करताना दिसत होती.