Premium

ट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच

Viral Video of Traffic Jam : सोशल मीडियावर वेगवेगळ्या शहरांतील ट्रॅफिक जामचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक ड्रायव्हर ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने किरकिर न करत बसता तो आपला वेळ योग्य प्रकारे सत्कारणी लावत आहे.

Viral Video of traffic jam
ट्रॅफिक जाम व्हायरल व्हिडीओ (फोटो – saichandshabarish instagram)

ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढतेय. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरात दिवसातील अनेक तास ट्रॅफिकमध्ये जातात. गेल्या काही दिवसांपासून बंगळुरूमधील ट्रॅफिकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ट्रॅफिकमुळे नागरिक हैराण होताना दिसत आहेत. बऱ्याच वेळा हे ट्रॅफिक जॅम इतके लांब असते की यामुळे अनेकांच्या फ्लाइट, महत्त्वाच्या मीटिंग चुकतात. सध्या ट्रॅफिकचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यातून ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर आपला वेळ कसा सत्कारणी लावायचा याचे उत्तम उदाहरण देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरू हे शहर देशातील आयटी हबऐवजी लवकरच ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळखले जाईल, या ट्रॅफिक जॅममुळे अनेकांना योग्य वेळी इच्छितस्थळी पोहचता येत नाही. कोणत्याही ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी अनेक तास आधी घरातून बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत फसलेल्या एका बस ड्रायव्हरचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, एक बसचालक ट्रॅफिकमध्ये फसला असताना आपला वेळ जेवणासाठी वापरत आहे.

ट्रॅफिक जाममध्ये केले दुपारचे जेवण

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय की, एक बसचालक ट्रॅफिकमध्ये अडकल्याने दुपारचे जेवण करत आहे. यातून ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर लोकांनी त्या वेळेचा योग्य उपयोग कसा करायचा याचे उत्तम उदाहरण देण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर saichandshabarish नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळपासून उपाशी, एक बासरी विकण्याची वाट पाहतोय; गरीब विक्रेत्याचा भावनिक Video इंटरनेटवर व्हायरल

ट्रॅफिक जामचा हा व्हिडीओ रेशीम बोर्ड जंक्शनजवळ बनवण्यात आला आहे. या व्हिडीओवर आता कमेंट करत युजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने ‘अडचणीत संधी’ असे या परिस्थितीचे वर्णन केले आहे. त्याचबरोबर वेळेचा योग्य वापर होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. तर दुसर्‍या युजरने सांगितले की, त्याने लोकांना ट्रॅफिक जाममध्ये एखादा चित्रपट पाहून पूर्ण करताना पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वी बंगळुरूच्या ट्रॅफिकमधील एका तरुणीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत होता, ज्यात ही तरुणी ट्रॅफिकमध्ये फसल्याने स्कूटीवर लॅपटॉप ओपन करत काम करताना दिसत होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 10:44 IST
Next Story
MBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला! महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल