जगभरात अनेक धोकादायक ठिकाणं आहेत. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी लोकवस्तीही आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी येथील लोकांना दररोज वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असला, तरीही हे लोक सुखाने आपले आयुष्य जगत असतात. सध्या भारतातील अशाच एका अतिशय धोकादायक घाटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांची बोबडी वळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत हा विकसनशील देश आहे. आपल्या देशातील अनेक भागांमध्ये अजूनही सामान्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. परिणामी शहरी भागातील लोकांपेक्षा ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सध्या हिमाचल प्रदेशातील अतिशय दुर्गम भागातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आपण हिमाचल रस्ते वाहतूक महामंडळाची बस पाहू शकतो. दरम्यान ही बस चंबा ते किल्लार हा प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : आधी खांद्यावर बसला, मग प्रेमाने पाहिले आणि नंतर…! अशी भन्नाट चोरी तुम्ही कधी पाहिली आहे का? Video Viral

ट्रॅव्हल भारत नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत १.५ मिलिअनहूनही अधिकवेळा पाहिला गेला असून जवळपास ३० हजार लोकांनी तो लाइक केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ”हिमाचल प्रदेशातील एचआरटीसी बसचा चंबा ते किल्लारपर्यंतचा रोमांचकारी प्रवास.” दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसणारा हा रस्ता भारतातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक मानला जातो.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा कच्चा रस्ता खूपच कमी रुंदीचा असल्याने ही बस अतिशय संथ गतीने आणि काळजीपूर्वक पुढे सरकत आहे. तसेच या रस्त्याच्या मधोमध एक सुंदर धबधबाही वाहत आहे. हा घाट पार करत असताना चुकून तोल गेल्यास ही बस खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटलंय, ‘कमकुवत हृदय असणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहू नये.’

हेही वाचा : बाळाला कडेवर घेऊन भाषण केलं म्हणून महिला आयएएस अधिकारी ट्रोल; पतीने दिलेलं उत्तर जिंकेल तुमचं मन

दरम्यान, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. देवभूमी म्हणून ओळखले जाणारे हे राज्य आपल्या पर्यटन स्थळांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे आपल्याला उंच पर्वतरांगा, पुरातन मंदिरे, सुंदर नद्या पाहायला मिळतील. हे निसर्ग सौंदर्य पाहून कोणालाही प्रसन्न वाटेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus ride from chamba to killar in himachal pradesh will fill your chest with fear watch viral video pvp
First published on: 06-11-2022 at 11:20 IST