Video : वणव्यात अडकलेल्या सशाला वाचवण्यासाठी त्याने स्वत:चा जीव घातला धोक्यात

अशी माणसं फार क्वचित सापडतात

त्याच्या धाडसाचा आणि प्रयत्नाचा व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे.

हल्लीच्या जमान्यात जिथे माणसे एकमेकांच्या मदतीसाठी धावून जात नाहीत, तेथे मुक्या जनावरांसाठी एखाद्याने स्वत:चा जीव धोक्यात घालणे म्हणजे दुर्मिळ घटना म्हणायला हवी. कॉलिफोर्नियामधल्या एक तरुणानं सशाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून मानवी जगात अजूनही थोडीफार भूतदया शिल्लक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये वणवा लागण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. काही दिवसांपूर्वी येथील जंगलात असाच वणवा पेटला होता. अन् एका तरुणानं आगीच्या दिशेनं धाव घेतली. तो नेमकं काय करत होता याचं आकलन अनेकांना होत नव्हतं. पण, थोड्यावेळाने सारा प्रकार तिथून जात असलेल्या लोकांच्या लक्षात आला. या ठिकाणी वणव्यामुळे भेदरलेला ससा सैरावैरा पळत होता. तो जंगलाच्या दिशेनं पळाला असता तर नक्कीच त्याचा होरपळून मृत्यू झाला असता. बऱ्याच प्रयत्नानंतर तरूणाने या सशाची आगींच्या झळांपासून सुटका केली आणि त्याला आगीतून सुरक्षितपणे बाहेर काढले. या तरुणाचं नाव समजू शकलं नाही तसेच पुढे येऊन आपल्याविषयी बोलण्यासही त्यानं नकार दिला. म्हणूनच या व्यक्तीविषयी फारसं काही समजू शकलं नाही, पण त्याच्या धाडसाचा व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: California wildfire this guy risked his life to save a rabbit

ताज्या बातम्या