scorecardresearch

ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारीसाठी पोलिसांना फोन; पण पंजाबी लग्नातील वरात थांबवण्यासाठी आलेल्या पोलिसांनी असं काही केलं की…

कॅलिफोर्नियातील एका पंजाबी लग्नात रात्री उशिरा मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याची तक्रार करण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

Call police for noise pollution complaints But the police who came to stop the Punjabi wedding party did something like that
पुढे जे झाले ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. (Photo : Instagram/@kandaproductions)

कोणत्याही पंजाबी लग्नात ढोल-ताशांवर भांगडा नाही केला तर काय केले? तुम्हीही कधी लग्नात गेला असाल तर तुम्ही पाहिले असेल की पंजाबी लग्न रात्रभर चालतात. जगात कुठेही भारतीय पद्धतीतील लग्न पार पडत असतील, तर तिथेही नाच-गाणे होणारच. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील असून तो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील एका पंजाबी लग्नात रात्री उशिरा मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याची तक्रार करण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र पुढे जे झाले ते पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

ज्या ठिकाणी लग्न पार पडत होते तेथील शेजाऱ्यांनी रात्री उशिरा मोठ्या आवाजात गाणी वाजवत असल्याची तक्रार करण्यासाठी सॅन जोक्विन काउंटी शेरीफ ऑफिसर्सना बोलावले होते. मात्र लग्नात वाजवली जाणारी गाणी थांबवण्याऐवजी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांसोबत जोरदार डान्स केला. व्हिडीओमध्ये, पोलीस इतर पाहुण्यांसोबत पंजाबी गाण्यावर आनंदाने नाचताना दिसत आहेत.

Video: काकांना मानाचा मुजरा! PMPML बस चालकाने सिंहगडावर जाताना गायलेला पोवाडा ऐकून येईल अंगावर काटा

कॅलिफोर्नियास्थित वेडिंग फोटोग्राफी कंपनी, कांडा प्रोडक्शन पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १५ एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला असून तो आतापर्यंत ६.१८ लाख वेळा पाहिला गेला आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तक्रारीनंतर पोलिसांना बोलावले जाते, पण हे पंजाबी लग्न आहे.’ यानंतर नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Call police for noise pollution complaints but the police who came to stop the punjabi wedding party did something like that pvp

ताज्या बातम्या