Camel Swiming Sea Video Viral : उंट हा रखरखत्या वाळवंटात राहणारा प्राणी, ज्याला वाळवंटातील जहाज असेही म्हटले जाते. वाळवंटात पाण्याच्या कमतरतेमुळे या प्राण्याच्या पोटात बराच काळ पुरेल इतके पाणी साठवण्यासाठी क्षमता असते. ही त्यांना मिळालेली एकप्रकारची दैवी देणगीच म्हणावी लागेल. कारण रखरखत्या उन्हात तापलेल्या वाळूत हाच प्राणी वास्तव्य करताना दिसतो. पण, हाच प्राणी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा अथांग निळाशार समुद्र पाहील तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असेल, याचा कधी विचार केला आहे का? पण अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तुम्हाला हे दृश्य दिसून येईल. यात जेव्हा उंट पहिल्यांदाच समुद्रात पोहोचला तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. तो पाणी पाहून इतका उत्साहित झाला की तो आनंदाने पाण्यात खेळू लागला.
उंट वाळूच्या विशाल डोंगरात न थकता, न पाणी पिता लांब अंतर प्रवास करू शकतो. पण, जेव्हा हा वाळवंटातील उंट समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला तेव्हा त्याचा उत्साह आणि खेळकरपणा पाहण्यासारखा होता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक उंट आयुष्यात पहिल्यांदाच समुद्रकिनारी पोहोचतो, तेव्हा उंच उसळत्या लाटा पाहून उत्साहित होतो. ज्या उंटाने कधीही इतकं पाणी पाहिलं नाही, त्याला अचानक अथांग समुद्रात पोहण्यास मिळाल्याने त्याच्या आनंदाला सीमा उरत नाही. पाणी पाहून तो इतका खूश होतो की, पाण्यात उड्या मारू लागतो, लाटांशी खेळू लागतो आणि संपूर्ण शरीर पाण्याने भिजवतो. हे दृश्य इतके मनमोहक आहे की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लाखो लोकांनी तो पाहिला आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हिडीओवर कमेंट केली की, “उंटाला पाण्यात अशा प्रकारे मजा करताना पाहणे हे जादूपेक्षा कमी नाही, हा निसर्गाचा चमत्कार आहे!”, तर दुसऱ्याने म्हटले की, “या व्हिडीओने माझा दिवस आनंदी केला. उंटाचा उत्साह पाहण्यासारखा आहे!”