परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थी अथवा उमेदवाराच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. एका परीक्षेसाठी लोक दिवस-रात्र जागून अभ्यास करतात. एका परीक्षेवर त्यांचे भविष्य अवलंबून असते. अनेकदा परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहचल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांना परीक्षेला बसला आले नाही तर विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते. असाच काहीसा प्रकार नुकताच बिहारमधील एका परीक्षा केंद्रावर घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका परीक्षा केंद्रावर एक तरुणी उशीरा पोहचली आणि तिला प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश केंद्राचे गेटही बंद करण्यात आले होते पण तरीही तिने हार मानली नाही. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी तरुणीने जे काही केले ते पाहून नेटकरी चक्रावले आहे.

परिक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी तरुणीचा अजब जुगाड

जेव्हा ती परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला कळले की तिला उशीर झाला आहे आणि दरवाजे बंद झाले आहेत. पण तरुणी रडत बसली नाही ऐवजी तिने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी अजब ‘जुगाड’ शोधाला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की,”ही तरुणी चक्क जमिनीवर झोपते आणि थेट गेटच्या खालून केंद्रात प्रवेश करत आहे. गेटच्या खाली लहानशा अंतरातून जाण्यात यशस्वी होते. तेथे काही लोकांच्या मदतीने गेटमधून शिरताना दिसत आहे. परीक्षेसाठी तरुणीने स्वत:चा जीव धोक्यात टाकला आहे.”

तिला सोडण्यासाठी आलेल्या तिच्या नातेवाईकांनी तिला बंद गेटच्या खाली असलेल्या अंतरातून परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मदत केली. या क्लिपमध्ये ती उमेदवार काळजीपूर्वक गेटखाली स्वत:ला दाबून दुसर्‍या बाजूला जाताना दिसत आहे. उशिरा पोहोचल्यानंतरही, ती धडपडत परीक्षा परिसरात प्रवेश करत होती. परंतु तिला परीक्षा लिहिण्याची परवानगी मिळाली की नाही हे माहित नाही.

ही घटना राज्यातील नवादा भागात घडली आहे, परंतु ती ज्या परीक्षेला बसली होती त्याबद्दल तपशीलवार माहिती नाही.

Viral Video पाहून नेटकरी चक्रावले

गेट आणि ग्राउंडमधील कमी अंतरातून ज्या पद्धतीने ती पलीकडे गेले ते पाहून त्या महिलेच्या शरीराच्या लवचिकतेने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. गेट खालून आत प्रवेश करताना पाहून काही जणांनी हशा पिकला आहे तर काहींनी परीक्षेला बसण्याच्या तिच्या हताश प्रयत्नाचे कौतुक केले.

“रडण्याऐवजी आणि शिक्षक दरवाजे उघडण्याची वाट पाहण्याऐवजी तिने स्वत:च्या बुद्धीचा मेंदूचा वापर केला.. जसे की, जेव्हा सर्व दरवाजे बंद करतो तेव्हा दरवाज्या खालून जा”, अशी कमेंट एकाने केली आहे. “चांगला अभ्यास करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी धडपडणाऱ्यांना कोणीही मागे खेचू शकत नाही. जे कठोर परिश्रम करतात आणि प्रगती करतात त्यांना नक्कीच यश मिळेल. हे पाहून आनंद झाला”, दुसर्‍याने लिहिले.

दरम्यान, काही इंटरनेट वापरकर्त्यांनी परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले, “स्वागत आहे हे बिहार आहे… बिहार नवशिक्यांसाठी नाही”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate sneaks into gate after arriving late at exam centre in bihars nawada video goes viral snk