Scary Car Bike Accident Video : रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय, ज्यात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागतायत. या अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. यातील काही अपघात हे चालकांच्या चुकांमुळे घडतात, पण यात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या अशाच एका अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका कारचालकाच्या चुकीमुळे बाईकचालकाचा जीव धोक्यात आल्याचे दिसतेय.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता, एक माणूस रस्त्याच्या कडेने आपली बाईक घेऊन जात असतो. याचवेळी एक भरधाव वेगाने येणारी कार जवळ येत असल्याचे दिसतेय. कारचा वेग इतका भयानक होता की बघताच क्षणी ती समोरच्या बाईकला जाऊन धडकते. या अपघातानंतर कारचालक पटकन निसटण्यात यशस्वी होतो. पण, अपघात इतक भीषण होता की बाईकस्वार थेट हवेत फेकला जातो. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे दृश्य होते. हवेत फेकला गेला तरी तो सुखरूप जमिनीवर उतरतो, यात त्याला सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत होत नाही.
इतकंच नाही तर अपघातानंतर तो चक्क चालत जाताना दिसतोय, अपघात इतका भीषण होता की, बाईकस्वाराचा जीव धोक्यात असल्याचेच वाटत होते, पण त्याचे नशीब इतके बलवत्तर की तो वाचला. भीषण अपघाताचा हा व्हिडीओ @rastrvadi_4 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “यमराज आज सुट्टीवर होते.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “खरंच, नशिबाने त्याला वाचवले.” तिसऱ्या युजरने लिहिले की, “खरोखरच, अद्भूत नशीब.” आणखी एका युजरने लिहिले, “नशीब आहेच.”
