Car Auto Accident Video Viral : रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे तर काही समोरच्या वाहनचालकाने केलेल्या चुकीमुळे घडलेले असतात. अशा अपघातांत अनेकदा निष्पाप लोकांना जीव गमवावे लागतात. सध्या एका कार आणि रिक्षाच्या लाइव्ह अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून अक्षरश: तुमच्या अंगावर काटा उभा राहील. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून थांबताना किती सतर्क राहिले पाहिजे हे लक्षात येतेय. हा अपघात इतका भीषण आहे की, पाहताना काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओत एका चालकाने भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जाऊन जोरात धडक दिली. त्या अपघातात रिक्षातील प्रवासी जखमी झाले; पण सुदैवाने त्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. हा अपघात इतका भीषण आहे की पाहतानाही भीती वाटतेय.

कारची रिक्षाला जोरदार धडक

व्हिडीओत पाहू शकता की, महामार्गाच्या कडेला एक रिक्षा उभी आहे. चालक आतून रिक्षाची काच साफ करीत होता. त्या रिक्षामध्ये एक प्रवासी बसलेला होता. त्यावेळी पुढच्या क्षणी काय होईल याचा कोणी विचारही केला नव्हता. पण म्हणतात ना की, वादळापूर्वीची शांतता सर्वांत घातक असते, हेच व्हिडीओत पुढच्या सेकंदात घडताना दिसते. चालक रिक्षाची काच साफ करीत असतानाच अचानक एक मोठा आवाज आला. त्यानंतर अतिशय वेगाने एक कार येऊन रिक्षाला जोरदार धडक देते. त्या धडकेमुळे रिक्षा तिचा चालक आणि प्रवाशासह रस्त्यावर उलटी होते.

ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा होतो. पण, पुढच्याच क्षणी जणू चमत्कार घडतो आणि त्या रिक्षाला कारची एवढी जोरात धडक बसूनही त्या रिक्षातून चालक आणि प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडतात. मृत्यू त्यांच्या डोळ्यांसमोर उभा होता; पण त्यातूनही सुदैवाने दोघे वाचतात. इतक्या जोरदार धडकेनंतर चालकाचा जीव कसा वाचला हे पाहून सोशल मीडिया युजर्सही हैराण झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भीषण अपघाताचा व्हिडीओ @Deadlykalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यावर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, तो आंधळा नव्हता; तो ड्रग्जचा व्यसनी होता. तर दुसऱ्याने लिहिलेय की, तू रिक्षाचालकाला का तोडलेस भावा.