Shocked Car Accident Video : अपघात कधी, कुठे, कसा होईल काही सांगता येत नाही. इतकंच नाही तर यावेळी मृत्यूच्या दाढेतून कोण, कधी कसं वाचेल हेही सांगू शकत नाही, कारण ही गोष्ट कोणाच्याही हातात नाही. अनेकदा असे म्हणताना आपण ऐकतो की, रोज घडणाऱ्या विविध घटना पाहता घरातून सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरुप घरी येईलच का नाही याची शाश्वती नसते. पण, घरातही माणूस सुखरुप राहू शकतो याचीही हल्ली काही गॅरेंटी देता येत नाही. कारण अशाच एका भीषण घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक भरधाव कार थेट घरात घुसते आणि हसतं खेळतं कुटुंब उदध्वस्त करतं. अपघाताचं हे भयावह दृश्य घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. खरंच खूप भीतीदायक आणि हृदयद्रावक घटना व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं आपल्या घरात जेवणाची तयारी करत होतं; तेव्हाच एक अनियंत्रित कार घराची भिंत तोडून थेट आत शिरली, ज्यामुळे घराचे तर नुकसान झालेच, पण त्या जोडप्यालाही गंभीर दुखापत झाली. ही घटना खरंच खूप भीतीदायक आणि हृदयद्रावक आहे. अपघाताचे भयावह फूटेज सोशल मीडियावर व्हायरल (Accident Video) अंगावर काटा आणणारी ही घटना अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्समध्ये घडली असून त्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा अपघात झाला, त्या वेळी या जोडप्याशिवाय त्यांचे तीन पाळीव श्वानही घरात उपस्थित होते. ही संपूर्ण घटना घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे भयावह फूटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Read More Todays Trending News : भरधाव ट्रक आला अन् कारबाहेर उभ्या कुटुंबाला…; अपघाताचा काळजात धडकी भरवणारा Live Video पाहाच व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये असे दिसून येते की, एक कार भिंत तोडून आत शिरली तेव्हा एक व्यक्ती टेबलावर जेवणासाठी सगळी अरेंजमेंट करत होता. त्याने जेवणाची प्लेट आणून ठेवली होती, यानंतर काहीतरी आणून ठेवत असतानाच भरधाव कार घरात घुसली, यावेळी तिथे तीन श्वानही खेळत होते. त्यांनाही या कारने उडवले, तर ते जोडपंही या घटनेत गंभीर जखमी झालं. कारण कारच्या धडकेमुळे भिंताचा मलबा त्यांच्या अंगावर उडाला. सर्व काही इतक्या वेगाने घडले की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. अपघाताचा हा भीषण व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स अवाक् झाले आहेत.