scorecardresearch

पाकिस्तानात सापडली लंडनमध्ये चोरीला गेलेली कार; चोराच्या ‘या’ एका चुकीमुळे लागला तपास

तुम्ही आजपर्यंत अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. पण यावेळी मात्र, चोरांनी चोरीची कार चक्क सातासमुद्रापार पोहोचवली आहे.

पाकिस्तानात सापडली लंडनमध्ये चोरीला गेलेली कार; चोराच्या ‘या’ एका चुकीमुळे लागला तपास
प्रतिनिधिक छायाचित्र

Stolen Car Found in Pakistan: तुम्ही आजपर्यंत अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. पण यावेळी मात्र, चोरांनी चोरीची कार चक्क सातासमुद्रापार पोहोचवली आहे. चोरांनी ब्रिटनमध्ये महागडी गाडी चोरली आणि ही गाडी अखेर पाकिस्तानात सापडली.लंडनमध्ये चोरीला गेलेली बेंटली कार पाकिस्तानच्या कराची शहरात सापडली आहे. लंडनमधून ‘बेंटले मुल्सेन’ कार चोरून कराचीत आणण्यात आली होती. कराचीच्या सीमाशुल्क अधिकार्‍यांनी या माहितीवर शिक्कामोर्तब करत, लंडनमधील कार सापडल्याचं सांगितलं आहे.

ब्रिटनच्या गुप्तचरांनी पाकिस्तानी अधिकार्‍यांना माहिती दिली होती की, एक महागडी चोरीची कार कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA) परिसरातील एका घरात पार्क केलेली आहे. सीमाशुल्क विभागाने या माहितीच्या आधारे कारवाई करत कार मालकाला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लंडनमध्ये काही आठवड्यांपूर्वी दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची आलिशान ‘बेंटले मुल्सेन सेडान’ कार चोरीला गेली होती. ही चोरलेली महागडी कार पाकिस्तानमधील कराची येथील एका बंगल्यात सापडली आहे. युनाइटेड किंगडमची राजधानी लंडनमधून ही कार चोरून कराचीत आणण्यात आली होती.

कराची येथील कलेक्टर ऑफ कस्टम्स एन्फोर्समेंट (CCE) ने ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीकडून माहिती मिळाल्यानंतर छापा टाकताना कराची शहरातील एका बंगल्यातून चोरीची बेंटले मुल्सेन सेडान कार जप्त केली आहे. रिपोर्टनुसार, ही कार कराची शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या डीएचए भागातील एका बंगल्यातून जप्त करण्यात आली आहे.

अशी शोधली कार

एका पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, कार चोरल्यानंतर चोराने कार कराचीला आणली. परंतु लाखो प्रयत्नांनंतरही चोर बेंटले कारमधून ट्रेसिंग ट्रॅकर काढू शकला नाही. त्याच आधारे लंडन पोलिसांनी कारचा पत्ता शोधून काढला आणि कारची माहिती पाकिस्तान प्रशासनाला दिली. ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी कारच्या जप्तीसाठी पाकिस्तान पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर कार जप्त करण्यात आली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या