गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदाबाद आणि सुरत विशेषतः प्रभावित झाले आहेत, पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुरत जिल्ह्यातील पलसाना येथे राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली – अवघ्या १० तासांत १५३ मिमी पाऊस कोसळला आहे.

दरम्यान गुजरतामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रविवारी गुजरातमधील शहरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर गांधीनगरमधील रस्ता खचला आहे. रस्त्यावर भल्ला मोठा खड्डा झाला असून त्यात एक पांढरी कार अडकलेली दिसत आहे.

action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
Potholes on internal roads due to rain in Pimpri city Pune news
पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…
nagpur, Dharampeth, pub license, drug abuse, noise disturbance, Nagpur pub, residential area, Shankarnagar, Ramnagar, political influence, police action, Nagpur news,
नागपूर : धरमपेठ ‘रस्त्या’वरील वादग्रस्त पबचा परवाना रद्द करा, त्रस्त नागरिकांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव
Busy roads in Dombivli are closed for traffic on Krishna Ashtami
कृष्ण अष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद
Nagpur has lost its status as green city due to the reduction of green cover due to cement roads
नागपूरमध्ये सिमेंट रस्त्यांमुळे हरित आच्छादनात घट, ग्रीन सिटीचा दर्जा हिरावला
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका X वापरकर्त्याने लिहिले, “गुजरात मॉडेलला आव्हानांचा सामना करावा लागत असताना, समस्या सोडवण्याचे उत्तरदायित्व फक्त व्यवस्थेवरच नाही तर ज्यांनी एकेकाळी त्याच्या उद्घाटनाचे श्रेय घेणाऱ्याचे देखील आहे. पारदर्शकता, पत्रकारांद्वारे जबाबदार आणि प्रामाणिक माहिती मिळवण्यासाठी कसून प्रयत्न, आणि सक्रिय नागरिकांच्या सहभागाची मागणी करूया.”

दुसरा वापरकर्ता म्हणाला, “गुजरातचे रस्ते इतके कमकुवत आहेत का?” आणि तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की “लज्जाहीन लोक तिथे उभे आहेत आणि मदत करत नाहीत.”

हेही वाचा – पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा

व्हिडिओ पहा:

हेही वाचा – पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी

मुसळधार पावसामुळे भुज, वापी आणि भरूच सारख्या इतर शहरांमध्ये देखील लक्षणीय समस्या निर्माण झाल्या आहेत, जेथे अनेक रस्ते आणि अंडरपास पुरामुळे दुर्गम झाले आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवस ओले हवामान कायम राहण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्यात आणखी पावसाचा अंदाज आहे.