Python Shocking Video Viral : सध्या सोशल मीडियावर अजगराचा एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. पावसाळ्यात जंगल परिसरातील रस्त्यांवरून वाहनं चालवताना थोडी काळजी घ्या असे वारंवार सांगितले जाते, कारण अनेक प्राणी यादरम्यान रस्यांवर येताना दिसतात. विशेषत: साप, अजगरासारखे सरपटणारे प्राणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर रस्त्यांवर आलेले दिसतात. अशाचप्रकारे एक भलामोठा अजगर पाण्याच्या प्रवाहाबरोबर रात्रीच्यावेळी रस्त्यावर आला. यावेळी तो सुरक्षित जंगलात जावा म्हणून अनेक वाहनं थांबली. पण, एक भरधाव कार न थांबता निर्घृणपणे त्याला चिरडून गेली. पुढे जे काही घडलं ते फारच मन हेलावणारं होतं.

अजगर झुडपाच्या दिशेन जात होता, इतक्यात…

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, पावसाळी रात्र आहे आणि जंगल परिसरातील रस्त्यावरून एक मोठा अजगर रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूच्या झुडपांमध्ये सरपटत जात होता. अजगराला पाहून अनेक वाहनचालकांनी माणुसकी दाखवली आणि ते वाहनं थांबवून त्याची झुडपात जाण्याची वाट पाहत होते. अजगर हळूहळू झुडपाच्या दिशेन जात होता, इतक्यात एक भरधाव वेगाने कार तिथून गेली. अजगर दिसत असूनही चालकाने कारचा वेग कमी न करता कार थेट अजगराच्या अंगावरून चालवली. हे पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले. पण, पुढच्याच क्षणी अजगर पुन्हा सरपटू लागला.

कार अंगावरून जाताच अजगर थोडावेळ बिथरला, अंग झाडू लागला, पण काहीवेळ तडफडल्यानंतर अजगराने हिंमत एकवटली आणि हळूहळू तो रस्त्यावरून बाजूला सरपटत जंगलात परत जाऊ लागला. घटनेची नेमकी तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे निश्चित झाले नसले तरी हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

अजगराचा हा व्हिडीओ एक्सवर @MohitTr11637443 नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “थोडी सावधगिरी एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवू शकते.” सोशल मीडियावर लोक त्या चालकावर टीका करत आहेत. युजर्सनी लोकांना पावसाळ्यात रात्रीच्या वेळी काळजीपूर्वक गाडी चालवण्याचे आवाहनही केले आहे. कारण पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अजगर, साप आणि इतर वन्य प्राणी त्यांच्या बिळांमधून बाहेर पडून रस्त्यांवर येऊ शकतात.