Accident Video Goes Viral: उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्यामुळं रस्त्यांवर धुक्याची चादर पसरली आहे. दिल्लीसह आजुबाजूची शहरंही धुक्यानी व्यापून गेली आहेत. परणामी परिसरात काही अंतरावरील दृष्य पाहणं नागरिकांसीठ कठीण झालं आहे. थंडीचं वातावरण असल्यानं सरकारकडून काही ठिकाणी शाळांना सुट्टी घोषीत करण्यात आलीय. तसंच कार्यालयात आणि कॉलेजला जाण्यासाठी अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. धुक्यामुळं २० हून अधिक गाड्या एकमेकींवर आदळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

….अन् महामार्गावर धावणाऱ्या गाड्यांनी समोरच्या वाहनांना जोरदार धडक दिली

सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ पुन्हा एकदा इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ २०१७ मध्ये तुफान व्हायरल झाला होता. हा भीषण अपघात आगरा-नोएडा यमुना एक्स्प्रेसवेवर झाला होता. दाट धुक्यामुळं या महामार्गावर अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर गाड्यांमधून बाहेर निघालेल्या प्रवाशांनी आरडाओरड केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला असेलच. पण आता थंडीच्या दिवसात गाड्या हळु चालवतानाच धुक्यात योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून अशाप्रकारचा भीषण अपघात पुन्हा घडणार नाही. हा व्हिडीओ शेअर करण्यामागे हाच उद्देश आहे.

iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Mobile theft in Local train
प्रवाशाच्या व्हिडिओमुळं मुंबई ट्रेनमधील मोबाइल चोर पकडला आणि एका मृत्यूचंही गूढ उकललं

इथे पाहा व्हिडीओ

आगरा-नोएडा यमुना एक्स्प्रेसवेवर भरधाव वेगानं जाणाऱ्या गाड्यांनी एकमेकींना धडक दिल्याचं या व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल. तसंच रस्त्याच्या बाजूला असणारी लोकं जोरजोरात ओरडून वाहन चालकांना गाड्या धीम्या गतीनं चालवण्याचं आवाहन करताना या व्हिडीओत दिसत आहे. दाट धुक्यामुळं पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाला समोरच्या गाड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यालाही अपघाताला समोरं जावं लागल्याचं व्हिडीओत पाहू शकता. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गावरील वाहतूक काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडयावर पुन्हा एकदा व्हायरल झाल्याने वाहनचालकांनी यातून धडा घेतला पाहिजे. जेणेकरून वाहन चालवताना अशाप्रकारच्या भीषण अपघाताला आमंत्रण देता येणार नाही.