scorecardresearch

Video: मांजरीला एका बुक्कीत केलं गारद, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. पाळीव प्राण्यांचा व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

Cat_Fight
Video: मांजरीला एका बुक्कीत केलं गारद, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल करताना हमखास दिसतील. पाळीव प्राण्यांचा व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. व्हिडीओ पाहता पाहता प्रवासातील वेळही निघून जातो. यापैकी अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दोन मांजरींच्या भांडणाचा हा व्हिडीओ आहे. एका मांजरीने दुसऱ्या मांजरीला बुक्की मारल्यानंतर केलेला अभिनय पाहून तुम्हीही पोट धरू हसाल.

व्हायरल व्हिडीओ दोन मांजरी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं दिसत आहे. काळ्या रंगाच्या मांजरीला दुसऱ्या खोलीत जायचं असल्याचं दिसत आहे. पण दुसऱ्या मांजरीने तिची वाट अडवून धरल्याचं पाहायला मिळत आहे. पुढे जाण्यासाठी काळी मांजर धाडस करते इतक्यात दुसरी मांजर पंजा उगारते. मग काय काळ्या मांजरीचा अभिनय पाहून तुम्हाला हसू अवरणार नाही. एका बुक्कीत काळी मांजर खाली पडल्याचा अभिनय करते आणि मागे पळू लागते. ८ सेकंदाचा हा व्हिडीओ animals.hilarious शेअर करण्यात आला आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बातमी लिहिपर्यंत सोशल मीडियावर याला सुमारे साडे तीन लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जणांनी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच फोटोखाली मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cat fight viral video on social media rmt

ताज्या बातम्या