Cat helps man in making pots adorable video goes viral | 'साथी हात बटाना...' मातीचे भांडे बनवतानाचा मांजरीचा हा भन्नाट Viral Video एकदा पाहाच | Loksatta

‘साथी हात बढाना…’ मातीचे भांडे बनवतानाचा मांजरीचा हा भन्नाट Viral Video एकदा पाहाच

मातीचे भांडे बनवणाऱ्या व्यक्तीच्या पुढे बसलेली मांजरही ते भांडे बनवण्यात सहभाग घेते आणि पुढे काय होते ते या viral video मध्ये एकदा पाहाच

cat viral video making pot
Photo : Social Media

पाळीव प्राणी बऱ्याच जणांना आवडतात. अनेकजण घरात पाळीव प्राणी पाळतात. ते त्यांच्यासाथी घरातील एक सदस्य किंवा जवळच्या मित्राप्रमाणेच असतात. दैनंदिन कामाच्या व्यापातून मोकळा वेळ काढून काही व्यक्ती त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांबरोबर मनसोक्त वेळ घालवतात. हा वेळ त्यांच्यासाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. मग यात त्यांच्याशी खेळताना मांजर, कुत्रा किंवा इतर पाळीव प्राण्यांच्या गोंडस हावभाव किंवा त्यांचे अचंबित करणाऱ्या गोष्टींचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. असे बरेच व्हिडीओ आपण दररोज पाहतोच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये पाहुया.

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी लढवली अनोखी शक्कल; Viral Video एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुंभार वापरतात त्या पद्धतीने चाकावर मातीची भांडी बनवत आहे. त्या व्यक्तीसमोर एक मांजर बसली आहे आणि ते त्या मातीच्या भांड्याचे निरीक्षण करत आहे. मध्येच ती मांजर त्या मातीच्या भांड्याला हात लावून त्या व्यक्तीप्रमाणे भांड्याला आकार देण्याचा प्रयत्न करते. या मांजरीची कॉपी करण्याची पद्धत नेटकऱ्यांना भावली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २७ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक नेतकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्याकडे असणाऱ्या मांजरीच्या गोंडस गोष्टी शेअर केल्या आहेत. पाहूया नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : ऐकावे ते नवलच! घरात व्हिडीओ गेम खेळत असताना त्याच्या अंगावर पडली वीज अन्…

Viral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय? हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 12:29 IST
Next Story
Airbnb In Goa: गोव्यात व्हिला बुक करताय? युवराज सिंगचे पाहुणे बनण्याची संधी; किंमत सर्वात कमी