भूक लागल्याचे सांगण्यासाठी मांजरीने काय केले पाहा; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू | Cats hilarious way knocking neighbours door to tell she is hungry wins internet watch viral video | Loksatta

भूक लागल्याचे सांगण्यासाठी मांजरीने काय केले पाहा; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

भूक लागल्यावर शेजारच्या घरी जाऊन या मांजरीने काय केले एकदा पाहाच

भूक लागल्याचे सांगण्यासाठी मांजरीने काय केले पाहा; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
या मांजरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे गोंडस हावभाव दाखवून आपल्या चेहऱ्यावर हसू आणणारे असतात, तर काही त्यांच्या नकलांवर आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मांजर चक्क दार ठोठावत असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘नेक्स्ट डोअर’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मांजर दार ठोठावत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये याबाबत सांगण्यात आले आहे. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या मांजरीला खायला द्यायला सुरुवात केली आणि आता ही मांजर भूक लागल्याचे सांगण्यासाठी चक्क त्यांचे दार ठोठावते, असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

मांजरीच्या या गोंडस कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 18:33 IST
Next Story
कोकणातल्या रस्त्यावर नक्की चाललंय तरी काय? ड्रायव्हर नसतानाही गोल गोल का फिरतेय ‘ही’ रिक्षा? पाहा Video