Shocking video: खराब रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेकदा अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दुचाकी चालक, चारचाकी चालक तसेच सरकारी वाहनांनाही याचा रोज सामना करावा लागतो. अशात अपघाताचाही मोठा धोका असतो. तसेच प्रवशांना खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे हे नेहमीचंच झालं आहे. दरम्यान सध्या याच खड्ड्यांमुळे एका महिलेचा जीव गेला असता मात्र बस कंडक्टरमुळे महिलेचे थोडक्यात प्राण वाचले.हा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून कधी काय होईल याचा नेम नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ तमिळनाडूमधील इरोडा येथील आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इरोडहून मेत्तूरला जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये ही घटना घडली. ज्यात एका बसच्या कंडक्टरने धावत्या बसमधून पडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे.

do you see Gautam Gambhir car collection
टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क, ‘या’ कारची किंमत तर…
Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
Viral VIDEO: Man Slaps & Kicks Thief Caught Stealing Purse Inside Delhi Metro
VIDEO: “मी मरेन काका, मला जाऊ द्या” दिल्ली मेट्रोमध्ये चोराला रंगेहात पकडलं; त्यानंतर काय घडलं पाहाच
I am so sorry Mumbai fan girl apologises to Hardik Pandya after T20 World Cup heroics video
‘मी हार्दिकची माफी मागते…’, टी-२० विश्वचषकानंतर लाइव्ह टीव्हीवर चाहतीने ‘त्या’ चुकीसाठी पंड्याला जोडले हात
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
a man carries Hand Cart Pushers in heavy rain
“माणूस त्याच्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो” भर पावसात हातगाडी वाहून नेणाऱ्या काकांचा VIDEO होतोय व्हायरल
a young man doing stunt while driving bike on a road
भररस्त्यावर स्टंटबाजी पडली तरुणाला महागात! पुढच्याच क्षणी दुचाकीसह धाडकन आपटला, VIDEO व्हायरल
terror of dogs in sambhajinagar street dogs attack on girl walking on the road video goes viral
रस्त्याने चालणाऱ्या तरुणीवर भटक्या श्वानांचा जीवघेणा हल्ला; किंचाळली, ओरडली पण…; थरारक घटनेचा video व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बस वेगात धावत आहे. यावेळी पुढच्या स्टॉपला उतरण्यासाठी महिला जागेवरुन उठून बसच्या दरवाजाजवळ येते. तेवढ्यात बस खड्ड्यात जाऊन जोरात हलते आणि तिचा पाय घसरतो. ती दरवाजाच्या बाहेर जाते, तेवढ्यात तिथेच उभा असलेला कंटक्टर महिलेला पकडतो आणि तिला आतमध्ये खेचतो. कंडक्टरने तिच्या केसांना पकडून बसमध्ये ओढले.

तरुणीने बसमधून खाली पडलेले तिचे सामान आणून तिला परत बसमध्ये आल्यावर पाणी प्यायला दिले जाते. कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे तरुणीला वाचवण्यात यश येते.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: गंगेतून पकडलेल्या मगरीची भाविकांनी केली पूजा; लोकांनी केला ‘जय श्रीराम’चा जयघोष

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून बस कंडक्टरचं सर्वजण कौतुक करत आहे. एका युरने कमेंट केली, बस कंडक्टर देवासारखा उभा होता, तर दुसऱ्या युजरने खराब रस्त्यांमुळे हे घडलं असल्याची टीका केली आहे. बस चालकामुळेच त्या महिलेचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हा व्हिडीओ @HateDetectors या अकाऊंटवरुन शेअर केला असून नेटकरी वारंवार हा थरारक व्हिडीओ पाहत आहेत.