Snake Vs Eagle Fight Video: साप आणि गरुड यांच्यातील वैर सर्वांनाच ठाऊक आहे. दोघांमध्ये कायमचा संघर्ष असतो. गरुड हा अत्यंत ताकदवान शिकारी पक्षी आहे आणि साप हे त्याच्या आहारातील महत्त्वाची शिकार; त्यामुळे साप दिसताच गरुड त्याच्यावर विजेच्या गतीने झडप घालतो. गरुडाची नजर तीक्ष्ण आणि झेप अत्यंत वेगवान असल्यामुळे तो सापाला पटकन पकडतो. मात्र, अनेक वेळा सापसुद्धा शेवटच्या क्षणी जोरदार प्रतिकार करतो आणि ही झुंज अधिक चुरशीची बनते. आजवर साप आणि गरुडाच्या लढतीचे असंख्य थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या संघर्षात कधी गरुड विजयी होतो, तर कधी साप आपल्या चपळतेने बाजी मारतो. ही निसर्गातील झुंज केवळ रोमांचकच नाही, तर शिकारी आणि शिकार यांच्यातील संघर्षाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

सध्या सोशल मीडियावर एक थक्क करणारा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका शिकारी गरुड आणि एका सापामध्ये झालेली चुरशीची झुंज पाहायला मिळते. सुरुवातीला दिसते की, आकाशातून जोरात झेप घेत एक गरुड खाली जमिनीवर येतो आणि सरपटत चाललेल्या सापाला आपल्या धारदार पंजांमध्ये पकडतो. गरुडाची झपाटलेली हालचाल पाहून असं वाटतं की ही झुंज काही क्षणांतच गरुडाच्या विजयाने संपेल. पण, पुढे असं काही घडते की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

गरुड जसा सापाला जमिनीवर पकडतो, त्याला खाण्याची तयारी सुरू करतो, मात्र तेवढ्यात सापसुद्धा आपल्या जीवाच्या बचावासाठी जोरदार प्रतिकार करतो. साप सावधपणे, पण प्रचंड ताकदीनं गरुडाच्या शरीराभोवती स्वतःला गुंडाळतो. तो इतक्या बारकाईने आणि मजबूतपणे गरुडाच्या मानेभोवती लिपटतो की गरुडाची हालचालच थांबते. गरुड उडायचा प्रयत्न करतो, पण सापाची पकड इतकी घट्ट असते की तो जमिनीवरच तडफडतो.

थोड्याच वेळात गरुड पूर्णपणे सापाच्या विळख्यात अडकतो. हे दृश्य पाहून थक्क व्हायला होतं; कारण सहसा शिकारी पक्षीच सापासारख्या जीवांना सहज मारून टाकतात. मात्र, या व्हिडीओत सापाने गरुडास चकवले आणि पूर्ण ताकदीनं पलटवार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा थरारक व्हिडीओ @AMAZlNGNATURE या एक्स (ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे आणि सध्या नेटकऱ्यांमध्ये जबरदस्त चर्चेत आहे. अनेक जणांनी यावर आपल्या वेगवगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून, “हा निसर्गाचा अनपेक्षित न्याय आहे” असेही कोणी म्हटले आहे. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.