scorecardresearch

Premium

बाल्कनीत उभं राहून भांडत होतं कपल; तोल गेला अन् थेट तिसऱ्या मजल्यावरु खाली कोसळले दोघे, VIDEO व्हायरल

Viral video: एका जोडप्याने इतकं भांडण केलं की भांडण करताना दोघेही तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून थेट खाली रस्त्यावर पडले

Caught On Camera: Terrifying Moment Couple Fall Off Balcony While Fighting, Sustain Serious Injuries video v
जोडपे बाल्कनीतून खाली पडले(Photo: Twitter)

आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांशी भांडू लागतात. कपल्सची तर भांडणं नवी नाही, हल्ली जगाचा विसर पडल्यासारखा जोडपी कुठेही भांडू लागतात. सोशल मीडियावर दररोज असे काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये कपल्स एकमेकांशी भांडताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल कारण यामध्ये एक कपल भांडता भांडता तिसऱ्या मजल्यातून थेट खाली कोसळतं.

कधी काय होईल याचा खरंच नेम नसतो. या क्षणाला सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी पुढच्याच क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. असाच प्रकार एका कपलसोबत घडला.

funny video
Video : चिमुकल्याने चक्क झोपेत केली मध्यरात्री ३ वाजता गणपतीची आरती; मजेशीर VIDEO एकदा पाहाच
Amchya Pappani Ganpati Anala Song Viral anoter little boy ganpati video viral instagram trending now
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकल्याचा Video जिंकतोय नेटकऱ्यांचं मन
mumbai man falls into drain, man dies after falls in drain while collecting plastic bottles, plastic bottles death
प्लास्टिकच्या बाटल्या काढताना नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू
man sets temporary bed under trucks sleeps peacefully during journey watch viral video
आयुष्यात एवढी रिस्क…! काकांनी चालत्या ट्रकच्या खाली झोपण्यासाठी बनवला आरामदायी बेड; जुगाड Video पाहून युजर्स म्हणाले…

व्हिडिओमध्ये दिसत आहे, दोन कपलमध्ये भांडण सुरु आहे, भांडण करताना ते बाल्कनीच्या रेलिंगला धडकतात. यावेळी त्यांच्या धक्क्याने गॅलरीचे रेलिंग तुटते आणि दोघेही तिसऱ्या मजल्यावरुन थेट रस्त्यावर कोसळतात. पुरुष पाठीवर पडतो, तर स्त्री डोक्यावर आपटून जमिनीवर पडते. हा व्हिडिओ खूपच भीतीदायक आहे. दोघेही बाल्कनीतून पडल्यानंतर तेथे उभ्या असलेल्या वाहनांचे हॉर्नही वाजू लागतात.

जोडपे बाल्कनीतून खाली पडले

हा व्हिडिओ रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरातील असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की दोघांनाही ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर गंभीर दुखापतींवर उपचार करण्यात आले. व्हिडिओ पाहून असे दिसते की रस्ता आणि बाल्कनीमध्ये सुमारे २० ते २५ मीटर अंतर आहे. त्यामुळे त्यांची हाडे मोडली असावीत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हिंमत असेल तर ‘योगींना’ कॉल करा”; कारला दंड ठोठावल्याने एका हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, VIDEO व्हायरल

लोक काय म्हणाले?

या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. काही जणांनी व्यथा मांडली, तर टिंगल करण्यात पुढाकार घेणारेही लोक होते. एका युजरने लिहिले की, ‘हे खरंच खूप भीतीदायक आहे. आशा आहे की दोघांचा मृत्यू झाला नाही. दसऱ्या युजरने कमेंट केली की आता हे दोघे कधीच भांडणार नाहीत. काही लोकांनी सांगितले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना एखाद्या चित्रपटातील सीन सुरू असल्याचा भास झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Caught on camera terrifying moment couple fall off balcony while fighting sustain serious injuries video viral srk

First published on: 03-10-2023 at 17:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×