scorecardresearch

Video: मुलींसमोर स्टंट करण्याच्या प्रयत्नात घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा

Viral Video: स्टंट करण्याचा प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण सुटताच काय झाले पाहा

Video: मुलींसमोर स्टंट करण्याच्या प्रयत्नात घडली जन्माची अद्दल; नेमकं काय झालं पाहा
स्टंट व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील अपघाताचेही अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. बहुतांश वेळा अपघातांमध्ये चालकाची चुकी असल्याचे दिसून येते. गाडी चालवताना झोप येणे, अति वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणे या आणि अशा कारणांमुळे बरेच अपघात होतात. तर काही वेळा स्टंट करण्याचा प्रयत्न करण्याऱ्यांचाही अपघात होतो. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे किंवा स्टंटचे नीट प्रशिक्षण घेतले नसेल तर असे अपघात होतात. याचे देखील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका रिकाम्या रस्त्यावर दोन तरुणी चालत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी मागुन एक बाइकर तिथून जात असताना, स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. तो बाइकचे पुढचे चाक उचलून, बाइक चालवण्याचा प्रयत्न करतो. पण हा स्टंट करणे त्याच्या अंगलट येते, कारण स्टंट करताना बाइकवरील नियंत्रण सुटते आणि हा बाइकर थेट पुढे असणाऱ्या कारवर जाऊन आदळतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडिओ.

आणखी वाचा: ट्रेकिंग करताना उंचावरून तोल गेला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: चिमुकल्याने चक्क माकडांना केले खेळात सहभागी; हा खेळ पाहून नेटकरीही झाले अवाक, पाहा Viral Video

या बाइकरचा अयशस्वी स्टंट तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओतून प्रत्येक व्यक्तीने सुरक्षिततेचा धडा घेणे गरजेचे आहे, काही मिनीटांचा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे कोणताही स्टंट करण्याचा प्रयत्न करण्याआधी त्याचे योग्य प्रशिक्षण घेणे आणि सुरक्षेची पुर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 10:15 IST

संबंधित बातम्या