Gyanesh Kumar Resignation Protest at Jantar Mantar fact check : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्द्यावर निवडणूक आयोगाचे सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांच्या कालावधीत १४ आक्षेप नोंदविल्याचे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा अहवाल समोर आल्यानंतर तरुणांच्या नेतृत्वाखालील कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि काही विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

जंतरमंतर अनेक लोकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या आणि अटक करण्याच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर सोशल मीडियावर मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि हा व्हिडीओ अलीकडील आंदोलनातील असल्याचा दावा करण्यात आला होता. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ जुना आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @yadavanoop08 यांच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “मुसळधार पाऊस असूनही दिल्लीतील भाजप सरकारच्या विरोधात युवा Gen-Z रस्त्यावर उतरले आहेत. ‘EVM हटवा, मुख्य निवडणूक आयुक्त हटवा’ अशा घोषणा देत तरुणांनी आंदोलन केले. तसेच ‘EVM हटवा, लोकशाही वाचवा’, ‘भाजप हटवा, देश वाचवा’ व ‘भाजप हटवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा दिल्याचा उल्लेख कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.”

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास

आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून, तपास सुरू केला.

आमच्या असे लक्षात आले की, हा व्हिडीओ ए. के. स्टॅलिन यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी पोस्ट केला होता.

रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला एक्स (ट्विटर)वरील DCP न्यू दिल्ली यांच्या पोस्टपर्यंतही पोहोचता आले.

त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते की, दिल्लीच्या जंतरमंतरवरचा सांगून मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत असल्याचा दावा खोटा आहे. हा व्हिडीओ जुना आहे. सध्या शेअर केले जाणारे फुटेज हे भूतकाळातील एका घटनेशी संबंधित असून, त्याचा सध्याच्या घटनेशी संबंध नाही. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

त्यात २०२४ चे अनेक अहवाल होते, ज्यात जंतरमंतरवर ईव्हीएमविरोधी आंदोलन झाल्याचे नमूद केले होते.

https://www.amarujala.com/delhi-ncr/noida/demonstration-at-jantar-mantar-against-evm-noida-news-c-340-1-del1004-38185-2024-01-31

https://sabrangindia.in/massive-protest-in-delhi-by-bharat-mukti-morcha-with-one-demand-remove-evms-save-democracy

दोन वर्षांपूर्वी OHeraldo Goa या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला सापडला.

निष्कर्ष

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा २०२४ चा व्हिडीओ, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनातील अलीकडील व्हिडीओ म्हणून शेअर केला जात आहे. हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.