Signs That Someone Lies About Everything : आचार्य चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात आयुष्यातील योग्य व अयोग्य गोष्टीतील फरक ओळखण्यासाठी खूप उपयुक्त अशा गोष्टी सांगितल्या आहेत. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्याशी खोटे बोलते आहे हे समजणे खूप कठीण होऊन बसते. त्यामुळे सर्वात मोठी समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपल्यासोबत चुकीच्या गोष्टी घडत असतात; मात्र समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे, हेच आपल्याला ओळखता येत नाही. अशा परिस्थितीत, आचार्य चाणक्यांची ही पाच तत्त्वे समोरची व्यक्ती खोटं बोलते आहे याबद्दलकंगे संकेत समजून घेण्यास मदत करतात.
चोरून ऐकणे आणि डोळ्यांची भाषा
एखाद्या व्यक्तीशी बोलताना, त्यांच्या डोळ्यांकडे आणि नजरेकडे लक्ष द्या. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना वारंवार नजर चुकवत असेल, दुसरीकडे पाहत असेल, किंवा प्रश्न विचारल्यावर अस्वस्थ दिसत असेल. तर त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
शब्द आणि देहबोली
खोटे बोलताना समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात, देहबोलीत अनेकदा विसंगती दिसून येते. कदाचित ती व्यक्त एक गोष्ट सांगत असली तरीही; मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील बदल किंवा वागणूक काहीतरी वेगळेच सूचित करत असते. त्यामुळे अशा वेळी सावध राहणे आवश्यक आहे.
अति गोड बोलणे
काही लोक गरजेपेक्षा जास्त गोड बोलतात. गोड स्वभावाची व्यक्ती नेहमीच चुकीची नसते. पण, जे लोक गरजेपेक्षा जास्त स्तुती करतात त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. चाणक्य नीती अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला देते. कारण – अशी माणसे स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी अतिशय गोड भाषा वापरतात आणि एकदा त्यांचे काम झाले की मागे वळूनही पाहत नाहीत.
स्पष्टीकरण देणे आणि विषय बदलणे
जर कोणी तुमच्या साध्या प्रश्नावर गरजेपेक्षा जास्त स्पष्टीकरण किंवा वारंवार विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागले. तर लक्षपूर्वक ऐका. खोटे लपवण्यासाठी अनेकदा अनावश्यक बोलण्याचा आधार घेतला जातो.
क्षुल्लक गोष्टींवरून रागावणे
काही लोक खोटे बोलताना पकडले जाण्याच्या भीतीने प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राग व्यक्त करू लागतात. त्यामुळे एखाद्या साध्या आणि छोट्या प्रश्नावर कोणी अचानक संतापले, तर त्यांच्या वागण्यात काहीतरी गडबड असू शकते, हे लक्षात घ्या.
