Chanakya Niti on Marriage : बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये भांडण होण्याचे एक मोठे कारण म्हणजे एकमेकांवरील विश्वास कमी होणे. आचार्य चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’मध्ये कुटुंबात वारंवार भांडणे का होतात आणि त्यामुळे पती-पत्नीचे नाते कसे बिघडू शकते, याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास टिकवण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य वेळी त्यावर उपाय केला, तर पती-पत्नीमधील तणाव आणि गैरसमज कमी होण्यास मदत होऊ शकते. बऱ्याचदा, नवऱ्याला अशा काही सवयी असतात ज्या सामान्य वाटतात. पण, त्या त्यांच्या पत्नींसाठी खूप त्रासदायक ठरतात. इतकेच नाही, तर या सवयी त्यांचे नातेदेखील तोडू शकतात. चला जाणून घेऊया की, वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यासाठी पतीने कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत.
खोटं बोलणे
तुमच्या बायकोला प्रत्येक लहानसहान गोष्टीवर खोटे बोलण्याची सवय असेल. तर त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात की, नवऱ्याची ही सवय केवळ नातेसंबंधच नाही, तर मुलांचे भविष्यही उद्ध्वस्त करू शकते. पतीने आपल्या पत्नीशी कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही खोटे बोलू नये. पतीची ही सवय कोणत्याही चांगल्या कौटुंबिक जीवनाला एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते. खोटेपणावर आधारित नाती जास्त काळ टिकत नाहीत. जर तुम्हाला ही सवय असेल, तर तुम्ही वेळीच ती बदलली पाहिजे आणि सत्य बोलण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे.
संशय
आचार्य चाणक्य सांगतात की, जर नवरा आपल्या बायकोवर प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीबद्दल संशय घेत असेल. तर त्यामुळे नात्यातील विश्वास कमी होतो. या या सवयीमुळे घरातील भांडण होतात, ज्याचा थेट परिणाम मुलांवर होतो. विनाकारण बायकोला वारंवार प्रश्न विचारणे आणि तिच्या बोलण्यावर विश्वास न ठेवणे, या सर्व गोष्टींमुळे संशय निर्माण होतो आणि पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. नवरा-बायकोच्या नात्यात संशयाऐवजी परस्पर संवाद आणि सामंजस्य आवश्यक आहे.
गोष्टी लपवणे
अनेकदा असे दिसून येते की नवरा जाणीवपूर्वक आपल्या बायकोपासून अनेक गोष्टी लपवतो. कधीकधी, यामागे सोपे कारण असते, जसे की, गोष्टी विसरणे किंवा पत्नी समजून घेणार नाही असे गृहीत धरणे. यामुळे पती-पत्नीमध्ये अनावश्यक दुरावा निर्माण होऊ शकतो. नवरा-बायकोच्या नात्याचा पाया विश्वास आणि पारदर्शकतेवर रचलेला असतो. जर पतीने आर्थिक बाबी किंवा महत्त्वाचे निर्णय यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी पत्नीपासून लपवल्या, तर त्यामुळे नात्यात अविश्वास निर्माण होऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात की, हे नात्यातील दुराव्याचे एक प्रमुख कारण असू शकते. जर तुमच्यातही या सवयी असतील, तर तुम्हाला त्या लवकर बदलण्याची गरज आहे. कारण – या सवयी तुमचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करू शकतात, त्यामुळे वेळीच लक्ष द्या.
