Never Ignore These 3 Habits : आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्राच्या माध्यमातून जीवन सुधारण्यासाठी अनेक शिकवण दिल्या आहेत. नीतीशास्त्रामध्ये, आचार्य चाणक्य अशा दुर्गुणांबद्दलही सांगतात, ज्यामुळे अन्न, संपत्ती आणि ज्ञानाचा नाश होऊ शकतो. त्यामुळे चाणक्यांनुसार व्यक्तीने नेहमी तीन दुर्गुणांपासून दूर राहिले पाहिजे. तर आज आपण त्याचबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
श्लोक
आलस्योपहता विद्या परहस्तं गतं धनम्।
अल्पबीजहतं क्षेत्रं हतं सैन्यमनायकम्।।
१. आचार्य चाणक्य श्लोकातून सांगतात की, तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याचा तुम्ही सतत सराव केला पाहिजे आणि कधीही त्या ज्ञानाशी संबंधी नवीन गोष्टी करण्यात आणि शिकण्यात आळस नाही केला पाहिजे. जर तुम्ही आळशीपणा करत असाल, तर तुम्ही शिकलेल्या गोष्टी विसरू शकता आणि तुमचे ज्ञान वाढवण्यात मागे पडू शकता.
२. आचार्य चाणक्यांच्या मते, आपली संपत्ती दुसऱ्याच्या हातात गेली आणि तिचा योग्य वापर झाला नाही, तर त्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या पैशांची आणि संपत्तीची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमचे पैसे दुसऱ्या कोणाला दिले, तर ते तुम्हाला वेळेवर परत मिळतील याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवणे योग्य ठरेल.
३. बियाणे कमी असतील, तर शेती चांगली होऊ शकत नाही. त्यामुळे पीक कमी येते आणि अन्नाची कमतरता निर्माण होऊ शकते. चांगले पीक घेण्यासाठी पुरेशा प्रमाणात बियाणे असणे आवश्यक आहे, असा चाणक्यांच्या या विचाराचा अर्थ आहे.
४. याशिवाय, आचार्य चाणक्य सांगतात की सेनापतीशिवाय सैन्य कमकुवत होते आणि त्याचा पराभव होण्याची शक्यता वाढते. सेनापती सैन्याला योग्य दिशा देतो आणि शत्रूपासून आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
