Chanakya Niti on Marriage : आचार्य चाणक्य भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी अनेक सल्ले सांगितले आहेत. असे मानले जाते की, चाणक्य नीतीचे पालन केल्याने केवळ प्रगतीच होत नाही. तर नातेसंबंधही दृढ होतात. त्यातच प्रत्येक कुटुंबाने मुलीसाठी एक सक्षम आणि समजूतदार जीवनसाथी निवडणे हे प्रत्येक पालकाचे सर्वात मोठे स्वप्न असते, जेणेकरून त्यांच्या मुलीचे आयुष्य आनंदाने भरून जाईल आणि तिला कशाचीही कमतरता भासणार नाही.
आजकाल जेव्हा लोक आपल्या मुलीसाठी मुलगा शोधायला जातात. तेव्हा अनेकदा त्याच्या शिक्षणाबद्दल आणि नोकरी आणि पगाराबद्दल चौकशी करतात. पण, चाणक्य नीती सांगते की, आपल्या मुलीसाठी स्थळ निवडताना मुलामध्ये काही विशेष गुण पाहिले पाहिजेत, जेणेकरून त्यांची मुलगी सासरच्या घरात आनंदी राहील आणि तिला कधीही कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आता हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, मुलीचा आनंद टिकवण्यासाठी मुलामध्ये कोणते गुण असले पाहिजेत. तर आज आम्ही या बातमीतून तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या या विशेष गुणांबद्दल सांगणार आहोत.
श्रद्धा
मुलीसाठी मुलगा निवडताना, त्या मुलाची धर्मावर श्रद्धा आहे की नाही याकडे विशेष लक्ष द्या. चाणक्य नीतीनुसार, ज्या लोकांमध्ये त्यांच्या धर्मावर श्रद्धा नसते. ते आपले कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत, ज्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. चाणक्यांचा विश्वास होता की, पुरुषांची धर्मावर श्रद्धा असलीच पाहिजे, तरच ते एक सुखी आणि यशस्वी कुटुंब घडवू शकतात.
कष्टाळू
मुलगा कष्टाळू असावा. आचार्य चाणक्यांनुसार, जो व्यक्ती जीवनातील आपली ध्येये साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतो, तो यशस्वी होतो. असे पुरुष लग्नानंतर आपल्या पत्नीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. अशा पुरुषांना समाजात आणि कुटुंबात प्रचंड आदरही मिळतो.
निष्ठा
चाणक्यांनुसार, सुखी व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी पुरुषाची निष्ठा आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, तिचा जोडीदार प्रेमात पूर्णपणे प्रामाणिक असावा आणि तिचा कधीही विश्वासघात करू नये. आचार्य चाणक्यांच्या धोरणानुसार, ज्या मुलांची आपल्या नात्याप्रती अढळ निष्ठा आणि भक्ती असते, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असते.
