Identify Friends and Enemies in the Office : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, ज्या आपल्या जगण्याची पद्धत बदलू शकतात. म्हणूनच कामाच्या ठिकाणी प्रगती करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामधील एक म्हणजे कार्यालयातील सहकारी. चांगले सहकारी असणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहूनही अधिक महत्त्वाचे कामाच्या ठिकाणी चांगले आणि वाईट मित्र ओळखणे आहे.

कधीकधी, जे लोक तुमच्याशी गोड बोलतात, मैत्रीचा हात पुढे करतात, तेच तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तर आज आम्ही तुम्हाला कामाच्या ठिकाणी मित्र व शत्रू यांच्यात फरक ओळखण्यास मदत करणाऱ्या काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत.

प्रशंसा करणे आणि पाठीमागे टीका करणे

कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेकदा असे लोक भेटतात जे तुमच्यासमोर तुमच्या कामाची प्रशंसा करतात आणि पाठीमागे टीका करतात. तुम्ही अशा सहकाऱ्यांपासून शक्य तितक्या लवकर दूर राहिले पाहिजे. अशी माणसे तुम्हाला प्रगती करण्याची संधी कधीच देणार नाहीत आणि संधी मिळताच ते तुम्हाला खाली खेचून स्वतः पुढे जातील. त्याच वेळी, जो सहकारी तुमच्या कामाच्या चुका तोंडावर सांगतो तोच तुमचा हितचिंतक असू शकतो आणि तुमचे काम सुधारण्यास तुम्हाला मदत करू शकतो.

यशाने आनंदी न होणे

ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात, ज्यांना तुमचे यश पाहून आनंद होत नाही. उलट, ते तुमचा हेवा करतात आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसे कधीच तुमच्या भल्याचा विचार करत नाहीत. चांगले मित्र असल्याचा आव आणतात. पण, वेळ आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत तुमच्याबद्दलचा जळफळाट स्पष्ट दिसतो. आचार्य चाणक्य होणी नीतीमध्ये सल्ला देतात की तुम्ही अशा लोकांपासून ताबडतोब दूर राहावे.

चुका वाढवून सांगणे

आचार्य चाणक्य सांगतात की, ऑफिसमध्ये असे काही लोक असतात, जे तुमच्या अगदी छोट्या चुकाही इतरांसमोर मोठ्या करून सांगतात.अशा लोकांपासून दूर राहणे चांगले. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुमचा खरा मित्र तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करेल. खरा मित्र तुमच्या चुका इतरांसमोर सांगून तुम्हाला कमी लेखण्याऐवजी त्या सुधारण्यासाठी मदत करेल.

योजना समजून घ्या

आचार्य चाणक्य म्हणतात की, जो कोणी कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना ऐकून त्यावर काम करू लागतो, तो कधीही चांगला मित्र असू शकत नाही. असे लोक स्वतः पुढे जात असताना तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात.

कमकुवत बाजू सगळ्यांसमोर उघड करणे

जर तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणी तुमच्या कमकुवत बाजू वारंवार उघड करत असेल, तर ती व्यक्ती तुमचा खरा मित्र कधीच असू शकत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की, अशी व्यक्ती शत्रूप्रमाणे वागते आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीत अडथळा आणते.

तुमच्या ऑफिसमध्ये असे वागणारे लोक असतील, तर त्यांच्यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)