Chanakya Niti : माणसाने वाईट काळात काही महत्त्वाच्या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्यास जीवनात यश तर मिळतेच, शिवाय कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासही मदत होते.
असे म्हटले जाते की, जेव्हा आयुष्यात वाईट वेळ येते, तेव्हा ती तुमची परीक्षा घेण्यासाठी येते. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. चाणक्य सांगतात की, कठीण काळात आपण कोणत्या गोष्टी सोडता कामा नयेत, ज्यामुळे आपण संकटातून लवकर बाहेर पडू शकतो.
१. धैर्य राखणे
आचार्य चाणक्य सांगतात की, वाईट काळात माणसाने कधीही आपले धैर्य गमावू नये. कठीण परिस्थिती आली म्हणून घाबरून जाऊ नये. आयुष्यात वाईट वेळ ही रात्र संपून जसा दिवस उजाडतो, तशीच असते. त्यामुळे घाबरण्याऐवजी धैर्य टिकवून ठेवा. जसे सुख कायम राहत नाही, तसेच दुःखही कायम राहत नाही.
२. संयम बाळगणे
कोणत्याही परिस्थितीत संयम राखणे गरजेचे आहे. कठीण काळात घाईघाईने निर्णय न घेता अत्यंत गंभीरपणे विचार केला पाहिजे. वाईट काळात जर तुम्ही संयम ठेवला, तर तो काळ लवकर निघून जातो. संयमाने काम घेऊन चांगल्या वेळेची वाट पाहावी.
३. रागावर नियंत्रण ठेवणे
कठीण काळात माणसाने रागापासून दूर राहिले पाहिजे. वाईट वेळेत राग केल्यास संकटातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो आणि परिस्थिती अधिक कठीण होते. कितीही राग आला तरी तो नियंत्रणात ठेवावा.
४. सतत परिश्रम करणे
आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी मेहनत करणे कधीही सोड करू नये. कठीण प्रसंगी गप्प बसून न राहता सतत प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते. मेहनतीमुळे वाईट वेळ लवकर निघून जाते आणि चांगले दिवस सुरू होतात.
५. कुटुंबाची साथ न सोडणे
वाईट काळात कुटुंबापासून कधीही दूर जाऊ नये. कुटुंबाच्या साथीनेच कठीण प्रसंगातून बाहेर पडणे शक्य होते. आचार्य चाणक्य यांच्या मते, कुटुंब ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे वाईट काळात घरच्यांची मदत घेताना अजिबात संकोच करू नका.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
