Chanakya Niti Liar Signs : आचार्य चाणक्य यांची नीती आपल्याला आयुष्यात योग्य आणि अयोग्य व्यक्तींची पारख करायला शिकवते. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे खोटे बोलणे पकडणे सोपे नसते. कित्येकदा आपल्याला आतून जाणवते की, काहीतरी चुकीचे घडत आहे; परंतु समोरच्याचे खोटे आणि त्याचे खरे हेतू आपण वेळेत ओळखू शकत नाही. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आचार्य चाणक्यांनी पाच अशा नीती सांगितल्या आहेत, ज्या समोरच्याच्या मनात लपलेला खोटेपणा आणि त्याचा इरादा ओळखण्यात मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया त्या ५ नीतींबद्दल:

१) नजर चुकवणे आणि डोळ्यांची भाषा:

कोणत्याही व्यक्तीशी बोलताना तिचे डोळे आणि तिची नजर यांच्याकडे लक्ष द्या. जर एखादी व्यक्ती सामान्य संभाषणादरम्यान वारंवार नजर चुकवत असेल, इकडे-तिकडे पाहत असेल किंवा प्रश्न विचारल्यावर अस्वस्थ दिसत असेल, तर तिच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका.

२) बोलणे आणि हावभावांमध्ये तफावत:

खोटे बोलताना अनेकदा व्यक्तीच्या शब्दांत आणि तिच्या देहबोलीत फरक दिसून येतो. ती तोंडाने एक गोष्ट सांगत असेल; परंतु तिच्या चेहऱ्यावरील भाव, आवाजाचा टोन किंवा वागणूक काहीतरी वेगळाच इशारा देत असते. अशा वेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

३) गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे:

काही लोक खूपच गोड बोलतात. अर्थात, नेहमी गोड बोलणारी व्यक्ती वाईट असतेच, असे नाही; परंतु गरजेपेक्षा जास्त स्तुती आणि खुशामत करणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, स्वार्थी लोक आपले काम साध्य करण्यासाठी गोड भाषेचा अवाजवीपणे वापर करतात आणि काम झाल्यावर तुमची साधी विचारपूसही करत नाहीत.

४) वारंवार स्पष्टीकरण देणे आणि विषय बदलणे:

जर तुमच्या साध्या प्रश्नावर एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्पष्टीकरण देऊ लागली किंवा वारंवार मूळ विषय बदलण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तिचे बोलणे गांभीर्याने ऐका. अशी व्यक्ती तिचा खोटेपणा लपवण्यासाठीअनेकदा अवाजवी आणि अनावश्यक गोष्टींचा आधार घेते.

५) क्षुल्लक गोष्टींवरून रागवणे:

आपले खोटे पकडले जाण्याच्या भीतीने काही लोक प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राग व्यक्त करू लागतात. जर कोणी व्यक्ती साध्या आणि छोट्या प्रश्नावर अचानक तीव्र संताप दाखवू लागली, तर समजून जा की, नक्कीच काहीतरी गडबड आहे.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)