Chanakya Niti For Childs : आचार्य चाणक्य हे जगातील महान विद्वानांपैकी एक मानले जातात. त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंचे स्पष्टीकरण दिले आहे. आजकाल अनेक तरुण आचार्य चाणक्यांच्या तत्त्वांचे पालन करून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत आणि यश मिळवत आहेत. आचार्य चाणक्य यांना फक्त राजकारण, व्यवहारकुशलता आणि पैशांशी संबंधित ज्ञान नव्हते, तर जीवन कसे जगावे याबद्दलही त्यांना खूप चांगली समज होती.

माणसाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कसे वागावे आणि यशस्वी जीवनासाठी कोणती धोरणे पाळावीत याबद्दल सविस्तर सांगितले आहे. चाणक्य नीतीमध्ये, आचार्य चाणक्य यांनी नीती ग्रंथात अगदी विविध प्राणी आणि वनस्पतींची उदाहरणे देऊन, जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे स्पष्टीकरण दिले आहे. तर आज आपण एखाद्या व्यक्तीने झाडाकडून जीवनातील कोणते महत्त्वाचे गुण कसे शिकून घ्यावेत याबद्दल जाणून घेऊ…

श्लोक

एकेनापि सुवर्ण पुष्पितेन सुगन्धिता ।

वसितं तद्वनं सर्वं सुपुत्रेण कुलं यथा ।।

श्लोकाचा अर्थ

ज्याप्रमाणे सुंदर फुलांनी बहरलेल्या जंगलातील एक झाड संपूर्ण वातावरण सुगंधित करते. त्याचप्रमाणे एक चांगला आणि सद्गुणी मुलगा संपूर्ण कुटुंबाचे नाव उंचावतो.

आचार्य चाणक्यांनी म्हटले आहे की, मुलाने जंगलातील फुलाकडून महत्त्वाचे धडे घेतले पाहिजेत. झाडावरची फुले वातावरण सुगंधित करतात. फक्त वातावरण नाही तर स्वतःच्या सुगंधाने संपूर्ण जंगलाला शुद्ध करतात. त्याचप्रमाणे एक चांगला आणि सद्गुणी मुले देखील संपूर्ण कुटुंबाचे नाव मोठे करतात. म्हणून, मुलांनी नेहमी योग्य मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आणि यशासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जो मुलगा वाईट संगतीच्या मोहात पडून चुकीचा मार्ग स्वीकारतो तो स्वतःचे नुकसान तर करतोच. पण, त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठाही कमी करू शकतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही…)